सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांना मातृशोक – दुखद प्रसंगातही वर्धा जिल्ह्यात महाराजांचे अखंड कीर्तन

2441
जाहिरात

अंत्यविधी ऐवजी मरणोत्तर देहदान नेत्रदानाचा संकल्प

आकोटः ता.प्रतिनीधी

राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या आई श्रीमती सुशीलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांचे दीर्घ आजाराने काल महाशिवरात्रीच्या दिवशी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी जिजामाता चौक अकोट येथील राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे पार्थिव “गुरुवंदन” या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांनतर त्यांच्या इच्छा संकल्पाप्रमाणे अकोला येथील मेडिकल कॉलेज ला मरणोत्तर देहदान व नेत्रदान करण्यात येणार आहे. निधनाची वार्ता कळताच गुरुदेव प्रेमिं सह अनेकांनी अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली. त्यांच्या पश्चात मुलं-मुली सुना नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

 

दुखद प्रसंगातही सत्यपाल महाराजांचे कीर्तन

आईंचे निधन झाल्याच्या दुखद प्रसंगातही. सत्यपाल महाराजांचे वर्धा जिल्ह्यात किर्तन सुरु होते.सुमारे १५ हजारांपेक्षा अधिकचा जनसमुदाय महाराजांचे प्रबोधनात्मत कीर्तन ऐकत होते.आईचे निधन झाल्याचा अवघड प्रसंग असतांनाही प्रबोधनाचे विचार पेरणाऱ्या सत्यपाल महाराजांच्या जनजागृतीची ही अखंड सेवा सुरु होती.मात्र महाराजांच्या आईच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांची मन स्तब्ध झालीत. सत्यशोधकी पुरोगामी विचारांची व्यक्तीगत आयुष्यातही अवलंबलेली ही कृती पाहुन संपुर्ण महाराष्ट्राने महाराजांच्या राष्ट्रसेवेची प्रचिती घेतली.कदाचित कीर्तन कार्यक्रमाच्या लांब अंतरामुळं त्यांना आईचे शेवटचे दर्शन ही घेता येण कठीण ठरतय की काय अशी परीस्थिती होती.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।