150 लिटर गावठी दारू सह आरोपीला अटक,3 आरोपीचा शोध सुरू सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्यय यांच्या टीम ची कार्यवाही

0
1078

150 लिटर गावठी दारू सह आरोपीला अटक,3 आरोपीचा शोध सुरू
सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्यय यांच्या टीम ची कार्यवाही

चांदुर बाजार :-

शिरजगाव कसबा येथील ठाणेदार गोपाल उपाध्यय यांना दिनांक 20 ला रात्री 11.30 च्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी स्थानिक पाळा रोडवर नाकाबंदी लावली असताना त्यांना 150 लिटर गावठी दारू आणि एक आरोपी ताब्यात घेण्यात यश आले असून आरोपी ची चौकशी केली असताना उर्वरित 3 आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

नाकाबंदी दरम्यान विना नंबर च्या बजाज बॉक्सर मो.सा. चेचीस नं. DFFDHL41546 वर अवैधरित्या 2 पोत्यांमध्ये मोटर सायकल वर गाठोड्या सारखे बांधुन मोठ्या चार चाकी वाहनांच्या काळ्या रंगाच्या 5 रबरी ट्युब मध्ये अंदाजे 150 लीटर गावठी हा.भ. ची दारु कि. अंदाजे 22500/- ची घेवून येत असतांना आरोपी क्रिष्णा नामदेव परते वय 26 वर्ष रा. खोमई मध्यप्रदेश मिळून आला .त्यांचा एक साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाला.आरोपी नं. 02 हा घटनास्थळा वरून पळून गेला.त्यांच्या कडून जुना मोबाईल कि. 500/- रू तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल कि. अं. 15000/- रू असा एकुण 38000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर चौकशी केली असताना आरोपी ने साथीदार 1)सुभाष संतोष शेलोकार वय 23 वर्ष रा. खोमई मध्यप्रदेश फरार 2) प्रकाश राजनेकर रा. खोमई मध्यप्रदेश तर हा गावठी दारू ज्याच्याकडे घेऊन जात होते त्यांचे नाव गोल्या उर्फ कैलास वानखडे सांगितले त्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करीत आहे.

ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे,आणि त्यांच्या टीम ने केली.

बॉक्समध्ये
मध्यप्रदेश मधून महाराष्ट्र मध्ये वाहतूक करताना आदिवासी बांधव यांचा उपयोग घेऊन ही अवैध दारू वाहतूक आणि विक्री केली जात असल्याची चर्चा आहे.