श्रद्धा आणि विश्वास या सिद्धांतावर प्रपंच चालत असतो ! -ह.भ.प.रंगनाथ नाईकडे महाराज

0
1271
Google search engine
Google search engine

अकोट:संतोष विणके

श्रद्धा आणि विश्वास या दोन सिद्धांतावर प्रपंच चालत असतो.प्रपंच आनंदमय असावा आणि तो आनंददायी करण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन हभप नाईकडे महाराज यांनी केले.

स्थानिक श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे सुरू असलेल्या श्री.स॔त वासुदेव महाराजांच्या १०३ व्या जयंती महोत्सवात कीर्तन मालेतील तिसरे पुष्प गुंफताना महाराज बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी महशिवरात्री व शिवमहिमा प्रतिपादीत केला.शिवनामाचा जप केल्याने काम,क्रोध,याची बाधा न होता धर्म,अर्थ आणि मोक्षाची प्राप्ती होते.

वारकरी सांप्रदाय व गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराजांच्या जीवन कार्यावर बोलताना त्यानी शूर ओळ्खावा रनी व संत ओळ्खावा मरणी हा दाखला दिला.उच्च नीच गरीब श्रीमंत जात पंथ प्रांत या गोष्टींना थारा न देणारा एकच वारकरी संप्रदाय असल्याचे त्यांनी सांगितले.विठ्ठल पंढरपूरात भक्ताच्या भेटीकरिता गेले होते.भक्तांच्या ठायी निर्माण झालेलं सामर्थ्य केवळ आई-वडिल या दैवताच्या सेवेमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती ” या संत एकनाथ महाराज यांचे अभंगावर कीर्तन करतांना त्यानी आद्य क्रांतिकारक जनाबाई,चोखा महाराज,सोयराबाई यांचेसह परमार्थातील सुख,कर्मगती,समुद्र मंथन,श्रवण भक्ती आदि मुद्द्या चा उहापोह केला.
या प्रसंगी ह.भ.प.वासुदेवराव महल्ले,बालकृष्ण आमले,बापूराव साबळे ,राजू पाटील तसेच पिंपलोद ,जितापुर,शिवपुर ,कापूस तळणी येथील गावकरी मंडळी ने महाराज यांचे स्वागत केले.