गुटखा विक्री करणाऱ्या वर पोलिसांची कार्यवाही 9765 रुपयांचा गुटखा जप्त

0
1283

गुटखा विक्री करणाऱ्या वर पोलिसांची कार्यवाही
9765 रुपयांचा गुटखा जप्त

चांदुर बाजार:-

गुटखा बंदी वर महाराष्ट्र सरकार ने सकारात्मक पाऊले उचलले असताना अमरावती जिल्हात देखील गुटखा बंदी व्हावी यासाठी पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.तर चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलिसांनी गुटखा बंदी साठी कार्यवाही सुरू केली असल्याचे दिसत आहे.

स्थानिक शिरजगाव कसबा येथील रहिवाशी राहुल अंबादास यावले यांच्या घरी पंचसमक्ष रेड केली असताना त्यांच्या कडून एकूण 9765 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाही साठी अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राचारण करण्यात आले.ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उपाध्यय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टबल संजय उईके,सुरेश धाकडे,केशव सुने,नाईक पोलीस कॉस्टबल मिठाराम यांनी केली.