गुरुमाऊली जयंती महोत्सवात आदर्श विवाह संपन्न

0
737

आकोट:संतोष विणके

श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवात मध्यस्थी वधू-वर सुचक मंडाळाचे आदर्श विवाह केंद्राअंतर्गत आदर्श विवाह पार पडला.
देवरी येथील चि.गोपाल संजयराव फोकमारे आणि चि.सौ.कां.गिता आत्मारामजी वाकोडे रा.हिवरखेड यांचा आदर्श विवाह शनिवार दि.२२/०२/२०२० रोजी सकाळी श्रद्धांजली येथे हजारो भाविकांचे उपस्थित पार पडला.या वधू-वरांस आशिर्वाद संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले,मध्यस्थीचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे ,सचिव सुरेशदादा कराळे,कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे,प्रा.साहेबराव मंगळे,ह.भ.प.अंबादास महाराज,ह.भ.प.आत्माराम महाराज,संस्थेचे विश्वस्त महादेवराव ठाकरे,अशोकराव पाचडे आदी उपस्थित होते.