अब्ब् ब् ब् कोंडमध्ये दारुविक्रेत्याच्या घरासमोरच केला मोठ्ठा खड्डा

0
925
Google search engine
Google search engine

अब्ब् ब् ब् कोंडमध्ये दारुविक्रेत्याच्या घरासमोरच केला मोठ्ठा खड्डा

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे अवैद्य दारु विक्री बंद होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी चक्क दारु विकणार्याच्या घरासमोर रस्ताच खोदला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे अवैद्य दारु विक्री बंद होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी चक्क दारु विकणार्याच्या घरासमोर रस्ताच खोदल्यामुळे संबधीत प्रशासन अपयशी ठरल्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोंड येथील पाण्याच्या टाकीजवळ अवैद्य हातभट्टी दारुचे दुकाने होते.या ठिकाणी खुलेआम दारु विक्री होत होती.सतत या गल्लीत राहणार्या लोकांना याचा त्रास होत होता.ग्रामस्थांनी यापूर्वी बर्याचवेळा संबधीत विभागाला माहिती देऊनही यावर काहीही कार्यवाही होत नसल्यामुळे शेवटी वैतागून या गल्लीतील दत्ता कोरे यांनी चक्क जे सी बी ने या दुकानासमोरच मोठा खड्डा केला आहे.येवढ्यावरच न थांबता खड्याच्या जवळ तारेच कुंपनही केल आहे.तसेच कोंड गावात गल्ली बोळातही बर्याच ठिकाणी अवैद्य दारुविक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.बर्याचवेळा गावात दारुड्यानी भरचौकातही गोंधळ घातला होता. कोंड गावात पाण्याचा दुष्काळ अन् दारुचा सुकाळ अशी परस्थीती निर्माण झाली आहे.या गावातील व्यवसाय धारकांनाही दारु पिऊन येणार्या लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दारु विकणार्याच्या घरासमोर जेसीबीने सकाळी सात वाजता सुरवात केली होती जवळ पास हा जेसीबी दोन तास हा खड्डा करत होता.परंतू या ठिकाणी ऐकही गावपुढारी किंवा प्रशाससानाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी आले नव्हते.या घटनेमुळे कोंड गावातील दुसर्या ठिकाणीही दारु विकणार्यावरही आशीच वेळ आणली पाहिजे असे ग्रामस्थांकडून बोलले जात होते.आता कोंड गावातही खुलेआम सुरु आसलेल्या अवैद्य धंदेवाल्यांचे हे धंदे बंद होणार का यांना अभय देणार याकडेही लक्ष वेधले आहे.गाव माझा न्युजसाठी हुकमत मुलाणी उस्मानाबाद