आकोटात आज गुरुमाऊलींचा जन्मोत्सव

0
790
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके
———————————————–
* जयंती महोत्सवाची पुर्णाहूती
* भव्य दिंडी पालखी सोहळा
* माऊलींच्या अश्वाचे गोल व उभे रिगण सोहळा
*भव्य महाप्रसाद
*श्रद्धासागरवर उसळणार वासुदेव भक्ताचा जनसागर
————————-
आकोट ः
गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा फाल्गुन शुद्ध तृतिया बुधवार दि.२६ला श्री क्षेत्र श्रद्धासागर क्षेत्री भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे.या भक्तीसोहळ्याला राज्यभ-यातून हजारो वासुदेव भक्त सहभागी होत आहेत.

गुरुमाऊलींचा जयंती महोत्सव १९फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला असून श्री ज्ञानेश्वरी सामुहीक पारायण,श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण,प्रवचन ,किर्तनादी तथा विविध सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले या सोहळ्याची पुर्णाहूती बुधवार दि.२६ला ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे यांचे काल्याचे किर्तन व श्रीं चा जन्मोत्सव तद् नंतर महाप्रसादाने होत आहे.

*भव्य दिंडी व श्रीं चे पालखी रथ यात्रा*
गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवा निमित्त भव्य वारकरी दिंडी सोहळा तथा श्रीं चे पालखी रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे.दिंडी सोहळा सकाळी ८वा गुरुवर्याचे निवास मंदीर वासुदेव नगर येथून आरंभ होईल. नया प्रेस ,सत्यविजय टाॕकीज ,शिवाजी चौक, जयस्तंभ,याकुब पटेल चौक,यात्रा चौक ,सोमवार वेस ,नंदीपेठ मार्गे पालखी सोहळा श्रद्धासागरकडे मार्गस्थ होईल.दिंडीत गावोगांव च्या वारकरी दिंड्या सहभागी होत असून उत्कृष्ट वारकरी भजनी मंडळाना मुख्य रोहळ्यात उत्कृष्ट दिंडी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

*माऊलींच्या अश्वांचे रिंगण*
श्रींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होत असलेले कर्नाटक अंकली येथील श्रीमंत शितोडे सरकार यांचे अश्व सहभागी होत असून स.८वा वासुदेव नगर येथे पहिले व ९.३० वा नरसिंग विद्यालय ते शिवाजी चौक येथे दुसरे उभे रिंगण आणि श्रद्धासागर येथे स.११वा गोल रिंगण भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडणारे असेल .गतवर्षी माऊलींच्या अश्वांचे रिंगण भाविकांचे खास आकर्षण ठरले होते.
या भक्ती सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या विश्वस्थांनी केले आहे.