5 ते 6 लाखाच्या गुटखा ग्रामीण अधीक्षक यांच्या टीमने केला जप्त आसेगाव पूर्णानगर येथील कार्यवाही

0
1174

5 ते 6 लाखाच्या गुटखा ग्रामीण अधीक्षक यांच्या टीमने केला जप्त
आसेगाव पूर्णानगर येथील कार्यवाही

चांदुर बाजार:-

अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असून यांची गुप्त माहिती घेऊन अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या टीमने कार्यवाही चे सत्र सुरू केले असून यामध्ये दिनांक 23 च्या रात्री ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत 5 ते 6 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या टीम ला माहिती मिळाली की पूर्णानगर येथील रहिवासी पंकज पंजाबराव शिरभाते वय 37 वर्ष यांच्या कडील लोखंडी शेटर असलेल्या दुकान मध्ये अवैध पणे गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे त्यांनी रेड केली असता. अवैध प्रतिबंधित गुटखा दिलबाग,हॉट,नजर, बाजीराव,व पान मसाला, इ,असा मुद्देमाल मिळून आला. सदर अवैध गुटख्या अं.किंमत पाच सहा लाख रु. चा अवैध गुटख्यासंबंधीचा मुद्देमाल माल मिळून आला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आसेगाव यांचे ताब्यात देण्यात आले. सदर किंमतीचा गुटखा व तत्सम अन्न पदार्थांचा साठा जप्त करणयात आला.पुढील कारवाई साठी अन्न औषध विभाग अमरावती यांना पोलीस स्टेशन आसेगाव पूर्णा येथे फोनद्वारे बोलावून सदर ची कारवाई करण्यात येत आहे. यामधील गुटखा मुख्य पुरवठादार आरोपी यांचा तपास सुरू असून सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन.यांना मिळालेल्या खबर वरून करण्यात आली.

बॉक्समध्ये:-
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध गुटख्या वर कार्यवाही ही पोलिस विभाग कडून सुरू असून अन्न व प्रशासन यांची कार्यवाही न होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.