महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज – प्रा. माया म्हैसने

0
1127

माविम चा वर्धापन दिन नव्या संकल्पाने साजरा!

आकोटःसंतोष विणके

मविम वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्थानीक गजानन नगरमध्ये गृहस्वामीनी बचत गटाची स्थापना करुन वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज व शिवरायांच्या व प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले , कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ दीपिका भगत यांनी केले.कार्यक्रम मध्ये माविम संयोगिनी म्हणून सौ वर्षा दिंडोकार व सौ नेहा सेंदूरकर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण मध्ये माविम ची भूमिका व बचतगटा चे महत्व विशद केले.आपल्या अध्यक्षीय भाषणांतून श्रीरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ माया म्हैसने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं ही काळाची गरज आहे,म्हणून काळाची पावलं ओळखून महिलांनी बचतगट च्या मार्फत स्वतःची आर्थिक बाजू सबळ करावी,तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतः ला स्वावलंबी बनवावे असा मोलाचा सल्ला,त्यानी दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ अरुणा पुंडकर यांनी केले,कार्यक्रमास गृहस्वामीनी गटाच्या सौ वैशाली अपराधे, दिपाली गुहे,रुपाली तळोकार, जयश्री इंगळे,सुरेखा फाटे,माला फाटे, वैष्णवी अपराधे,नीता पुंडकर, जयश्री तळोकार इ. महिलांची उपस्थिती होती.यावेळी या बचतगटा मार्फत लहान मुलांकरिता एक निशुल्क संस्कारवर्ग चालवण्याचा मानस महिलांनी व्यक्त केला.