सैन्यअंतर्गत स्पर्धेत ९ सुवर्ण मिळवणाऱ्या कमांडो कुलदीप गणेशपुरे यांचा कार्यगौरव

0
716
Google search engine
Google search engine

गुरुमाऊली जयंती महोत्सवात वारकरी भूमी पुत्राचा गौरव

आकोटः संतोष विणके

सैन्यअंतर्गत स्पर्धेत ९ सुवर्ण मिळवणाऱ्या कमांडो कुलदीप गणेशपुरे यांच्या कार्याचा
गौरव गुरुमाऊलीं संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवात करण्यात आला.कमांडो कुलदिप सीमेवर देशाच्या सेवत असुन,वारकरी संप्रदायाचे सेवक आहेत.त्यांच्या कार्यगौरवाचा हा सत्कार त्यांच्या आईवडिलांनी स्वीकारला.नुकतेच सेनाअंतर्गत स्पर्धत त्यांना एकुण नऊ सुवर्ण पदक व प्रशस्तती पञ मिळाले आहे.

ते श्री क्षेत्र भास्कर नगर (अडगाव) येथील बालसुसंस्कांर शिबिरातील विद्यार्थी होत.तसेच ते वारकरी संप्रदायाचे प्रचारक व प्रसारक आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांचा गौरव करण्याचा संस्थेचा मानस होता,

परंतु ते देशसेवेत असल्याने त्यांच्या आईवडिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायातील या भूमिपुत्रांच्या या देशसेवेच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान व कौतुक सर्वत्र होत आहे.