विदर्भ सहयोग मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विदर्भ महोत्सवाचे आयोजन

0
1100
Google search engine
Google search engine

 

आकोटःसंतोष विणके

विदर्भ सहयोग मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रविवार दिनांक १ मार्च २०२० ला स्व. अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पुणे येथे भव्य विदर्भ महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे., सुवर्णमहोत्सवी स्मरणीका प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय भजनांनी महोत्सवाची सुरुवात होईल उद्घाटन सत्र सकाळी १० ते १ असेल. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री गजानन दाळू गुरुजी असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरदराव निंबाळकर करतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सौ. उषाताई ढोरे (महापौर पिं. चिं. मनपा ), मा. महेशदादा लांडगे (आमदार भोसरी) , मा. अण्णा बनसोडे (आमदार पिंपरी)

मा. विलास लांडे (माजी आमदार), डॉ. विठ्ठल वाघ (ज्येष्ठ कवी), मा. विनायकराव भोंगळे (उद्योजक), मा. शैलजाताई मोरे (माजी उपमहापौर), मा. सुबोध मेडशीकर (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिं. चि.), हर्षल गोंड पाटील (उद्योजक), मा यदुनाथ डाखोरे (मा. उपाध्यक्ष – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड), मा. अमित गोरखे (अध्यक्ष नॉव्हेल इन्स्टिटय़ूट), मा.डॉ. दिगंबर ईंगोले (अध्यक्ष विदर्भ सहयोग मंडळ), मा. प्रा.गुलाबराव देशमुख (कार्याध्यक्ष विदर्भ सहयोग मंडळ), मा. अरुण ईंगळे (सचिव विदर्भ सहयोग मंडळ), मा. हेमंत जिड्डेवार (माजी अध्यक्ष विदर्भ सहयोग मंडळ)
राहतील. यावेळी मा. ‌डॉ. विजय भटकर (ज्येष्ठ वैज्ञानिक), मा.डॉ. रवींद्र कोल्हे (सामाजिक कार्य), मा ‌प्रभाकर मानकर (कृषिक्षेत्र), मा. सुरेश वाढोकार (उद्योजक), मा. डॉ. प्रतिमा इंगोले (साहित्यिक), मा.निलेश जळमकर (चित्रपट दिग्दर्शक), मा. विनायक माळी (क्रीडाक्षेत्र), मा. पुरुषोत्‍तम गोळे (उद्योजक)
यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल

तर पिंपरी चिंचवड पुणे परिसरात उल्लेखनीय कार्य करणारे
मा. व्हि.एस.काळभोर (उद्योजक), मा. अण्णा बोदडे (सहाय्यक आयुक्त पिं. चि. मनपा), मा.,प्रा. श्याम मानकर, मा. प्रा. आशुतोष ठाकरे, मा. प्रा. सौ प्रज्ञा बोंद्रे, मा. ऋषिकेश खूमकर, मा. शिल्पा दाणे, मा. भूषण तारक (धावपटू), डॉ. प्रिया गोरखे यांना आपुलकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
दुपारी १ ते २ वैदर्भीय पद्धतीचे भोजनाचा आस्वाद घेता येईल. २ ते २:३० या वेळात श्री विठ्ठल पाचबोले मनोरंजनात्मक जादूचे प्रयोग
सादर करतील. त्यानंतर २:३० ते ३:३०
खेळ पैठणीचा – वैदर्भीय धाटणीचा हा महिलांसाठी कार्यक्रम होईल. विदर्भ महिला फोरम याचे संयोजन करतील. दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी मा. राजेश खवले यांचे
“आनंदी राहा यश मिळवा” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मा. हरीश बुटले, रविंद्र नांदूरकर (उपाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड), अनुप मोरे, दिलीप देशमुख, सारंगधर पल्हाडे यांची उपस्थिती राहील. दुपारी ४:३० ते ६ या वेळेत मा. दीपक हल्याळ व मा. स्मिता ओक यांचा विनोदी कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत समारोप सत्र व कृतज्ञता सोहळा पार पडेल अध्यक्षस्थानी माजी आमदार आशिष देशमुख असतील तर
प्रमुख उपस्थिती म्हणून मा. मधुकरराव कोकाटे (माजी अध्यक्ष – लोकसेवा आयोग), मा. नयनाताई मनतकार (माजी जि.प. सदस्या, अकोला ), मा. कांताताई मोंढे (माजी नगरसेविका पिं.चिं.मनपा ), मा. रमेश राऊत (माजी संचालक – महाबीज),

मा. सुरेश दाणी (माजी अध्यक्ष वि.स.मं ), मा. ज्ञानेश्वर सावंत (माजी सचिव वि.स.मं.), मा. महादेवराव तारक (माजी सचिव वि.स.मं), मा. मुरलीधर ढगे (माजी उपमहापौर पिं चिं मनपा), मा. हरीभाऊ तांदळे (अध्यक्ष विदर्भ मित्र मंडळ, भोसरी), मा. सुरेंद्र नावाडे (अध्यक्ष – श्री गुरुदेव सेवा मंडळ, पुणे), मा. संतोष पाटील (अध्यक्ष श्रीसंगम पतसंस्था) राहतील. सायंकाळी ७ ते ९

मा. सुमित पल्हाडे, मा.ऋतुजा सुर्यवंशी
संगीत रजनी ने महोत्सवाची सांगता होईल.