जाहिरात

शासनाच्या Fit India Movement व गो गर्ल्स गो या मोहीम अंतर्गत कडेगाव तालुकास्तरीय मुलींच्या 100 मीटर धावणे या स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगली/ कडेगांव:न्युज


शासनाच्या फीट इंडीया मुव्हमेंट व गो गर्ल्स गो
या मोहीमे अंतर्गत तालुकास्तरीय मुलींच्या १०० मिटर धावणे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उदघाटंन कडेगाव नगरपंचायतीचे बांधकाम सभापती नगरसेवक सागर सूर्यवंशी, अपसिंगे गावचे माजी सरपंच व स्पर्धेचे पुरस्कर्ते भारत सूर्यवंशी, नगरसेवक मा बापूराव जाधव यांचे हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील 1 ली ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या 120 मुलींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धा 6 ते 9, 10 ते 13 व 14 ते 18 या तीन वयोगटात घेण्यात आल्या. स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना क्रांती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कडेगाव यांचेकडून प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षिस वितरण कडेगाव नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष राजू जाधव, कडेगाव पोलीस ठाणे मधील कर्तव्य दक्ष पोलिस मा संतोष पाटील, नगरसेवक सुनील पवार व क्रांती कला, क्रीडा मंडळाचे कार्यवाह मा सागर सूर्यवंशी, मा बापूराव जाधव यांचे हस्ते करण्यात आले .
जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली व मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय कडेगाव यांनी संयुक्त आयोजित केलेल्या या स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यासाठी तालुका क्रीडा प्रमुख प्रा. बाळासाहेब माने, वैभव माने, अरुण पाटील, महेश कुंभार, माणिक गोरवे, गौरव पाटील , तानाजी देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
6 ते 9 वर्षे मुली :-
प्रथम- जान्हवी यादव,
द्वितीय – सई पवार,
तृतीय – महेक मुल्ला,
चौथा – श्रेया मदने,
पाचवा- अवंतिका कोळी
10 ते 13 वर्षे मुली :-
प्रथम – रिया पाटील,
द्वितीय – मृण्मयी यादव,
तृतीय – प्रणिता भोये,
चौथा – रिद्धी पाटील,
पाचवा – माया मदने
14 ते 18 वर्षे मुली:-
प्रथम – संस्कृती पवार,
द्वितीय – प्राजक्ता मोरे,
तृतीय – प्रगती जाधव
चौथा – जयोती राय,
पाचवा – श्रेया मोरे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।