मराठी वाचण्याची संस्कृती वाढवण्यासाठी मोठी वाचन चळवळ उभारावी लागेल: प्रांताधिकारी गणेश मरकड जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा..तो ही चक्क कडेगाव पोलीस ठाण्यात..!

जाहिरात

सांगली/कडेगाव न्युज

साहित्यिक लेखन हे समाजातील तळाच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी वाचन चळवळ उभारावी असे मत कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी व्यक्त केले
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कडेगाव पोलीस स्टेशन कडेगाव तालुका साहित्यिकांचा आणि मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारामध्ये योगदान देत असलेल्या व्यक्तीमत्वांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी कडेगाव चे प्रांतधिकारी गणेश मरकड हे होते अत्यंत आगळावेगळा असा हा साहित्यिक कार्यक्रम कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन हसबनिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता मरकड पुढे म्हणाले की लेखकानी साहित्यिक व्हायचे असेल तर माणूस बनणे आवश्यक आहे मराठी वाचवण्याची संस्कृती वाढवण्याकरीता वाचन चळवळ अधिक गतीमान कशी होईल या कडे साहित्यिकानी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे।
कडेगाव तालुक्यातील साहित्यिक व मराठीची सेवा करणारे कवी सदानंद माळी, रानकवी सु. धो. मोहिते,. श. राहुल वीरकर, चंद्रकांत वेल्हाळ, कवयित्री विमल जाधव, .अर्जुन पाटील, लेखक डॉ. गोविंद धस्के, एम. बी. जमादार, कथाकार आनंदराव पाटील, सूत्रसंचालक . आकाश पाटील, व ज्येष्ठ साहित्यिक तथा अंधकवी श्री. चंद्रकांत देशमुखे यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर अध्यक्षासह सर्व साहित्यिक कवीनी आपल्या काव्याचा आस्वाद रसिक श्रोत्यांना दिला महिला पोलीस काँन्स्टेबल धनश्री माळी यांनी आपला रोजचा अनुभव महिला पोलीसाची व्यथा काव्यात सादर करत श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले
कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नववारी साडी तर पुरुष कर्मचाऱ्यांनी भगवे कुर्ते घालून मराठमोळया सांस्कृतिक वातावरणात हा सोहळा साजरा झाला. कडेगाव तालुक्यातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, पत्रकार आणि साहित्य रसिक नागरिक सामील होते. श्रोत्यांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या होती आणि महिला विषयी कवितांना अत्यंत उत्साहाने दाद देण्यात येत होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी केले सूत्रसंचालन अंध कवी चंद्रकांत देशमुखे (बाबजी) यांनी केले. कडेगाव व खानापूर तालुका साहित्य परीषेदेतर्फे प्रांतधिकारी मरकड व पोलीस निरीक्षक हसबनीस यांचा सत्कार करण्यात आला डॉ. गोविंद धस्के यांचे तर्फे ‘मी भाषण करणारच’ हे पुस्तक भेट देण्यात आले. कडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप सांळुखे यांनी आभार मानले. या प्रसंगी कडेगाव पोलीस स्टेशनतर्फे उपस्थितांना स्नेहभोजनाचाही आस्वाद देण्यात आला

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।