चांदुर बाजार -माधान-काजळी रोडची दुरुस्ती करा,अन्यथा आंदोलन करू युवक काँग्रेसचे सामाजिक बांधकाम मंत्री याना तहसीलदार मार्फत निवेदन

0
604
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार -माधान-काजळी रोडची दुरुस्ती करा,अन्यथा आंदोलन करू
युवक काँग्रेसचे सामाजिक बांधकाम मंत्री याना तहसीलदार मार्फत निवेदन

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यातील चांदुर बाजार ते माधान, काजळी या रोडवरून अधिक जास्त प्रमाणात अवैध पणे गौण खनिज वाहतूक होत असल्याने रोडला जीवघेणे खड्डे पडले असल्याने यांची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील सामाजिक बांधकाम मंत्री याना तहसीलदार विकास मीना (भा.प्रा.से) यांच्या मार्फत दिलेल्या निवेदन मध्ये युवक काँग्रेस ने म्हटले आहे.

रोड बांधकाम होत असताना त्याची भार वाहून नेण्याची क्षमता वरून त्याचे बांधकाम केले जाते मात्र चांदुर बाजार-माधान-काजळी या रोडवर मोठं मोठे खड्डे पडले असल्याने अवैध पणे होत असलेल्या गौण खनिज वाहतुकीवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे अचलपूर विधानसभा अध्यक्ष यांनी केली आहे.

तसेच या रोडची दुरुस्ती न झाल्यास युवक काँग्रेसचे आंदोलन करण्यात येईल. तसेच या अवैध गौण खनिज वाहतूक वर स्थानिक पोलीस विभाग,तहसील विभाग,सार्वजनिक बांधकम विभाग यांनी काहीच प्रतिबंधक कार्यवाही केली नाही असे या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन देताना युवक काँग्रेसचे अचलपूर विधानसभा अध्यक विकास सोनार,पदाधिकारी अक्षय पोटे,स्वप्नील घायर,इम्रान खान,अतुल पोटे,प्रसन्न बेहरे हे उपस्थित होते.