चांदूर रेल्वे येथील आयटीआयमध्ये रोजगार मेळावा संपन्न – ७७ प्रशिक्षणार्थ्यांनी निवड

0
809
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे –

चांदूर रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एका नामवंत कंपनीचा रोजगार मेळावा शुक्रवारी (ता. २८) आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ७७ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करून शिफारस पत्र देण्यात आले.

चांदूर रेल्वेच्या आयटीआयमध्ये शुक्रवारी रांजनगाव, शिरूर (पुणे) येथील व्हरपुल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड या कंपनीचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कंपनीतर्फे वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशीयन, टर्नर, शिट मेटल, पेंटर, वायरमन, डिझेल, मशिनिस्ट, टूल अँड डाय मेकर, कोपा या ट्रेडमध्ये चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोझरी, अमरावती, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी या ठिकानाहुन आयटीआय यशस्वीरित्या पुर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेऊन ७७ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांना शिफारस पत्र देण्यात आले. सदर मेळाव्याचे आयोजन चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन आयटीआयच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती व्हरपुल कंपनीचे शरद काकडे व वसंत खोत यांनी घेतल्या. मुलाखतीपुर्वी प्राचार्य एस. एस. पाटबागे व तंत्र शाळेचे मुख्याध्यापक सुनिल वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता आयटीआयचे प्राचार्य एस. एस. पाटबागे, तंत्र शाळेचे मुख्याध्यापक सुनिल वानखडे, गटनिदेशक डि.टी. शिंगणे, शिल्प निदेशक एच. यु. चांदुरकर, नांदगाव खंडेश्वरचे शिल्प निदेशक देऊळकर, चांदूर रेल्वे आयटीआयचे मारोती मर्दाने, पी. डी. पाचपोर, एस. एन. ठाकरे, कैलास चौधरी, शहजाद खान, सुरज चांदूरकर, एस. टी. बेहेरे, सुमीत वलीवकर, गजानन भडांगे, प्रशांत टांगले, एल. पी. शेलोकार, एस. एस. कांबळे, एस. व्ही. निमकंडे, कर्मचारी राठोड, कनोजे, सारवाण, सावंत, मोहोड आदींनी परिश्रम घेतले.