विदर्भातील कारला येथील गिरासे बंधुची गरूड झेप ! – नाशिकात उभारला ‘निलय’उद्योग समुह

1920
जाहिरात
रौप्य महोत्सवी उद्यमशील वाटचाल
रोजगार या अत्यंत मुलभूत गरजेतून सुरू झालेला उद्योग प्रवास!

चांदूर रेल्वे : – (शहजाद खान)
अमरावती जिल्ह्यातील कारला या गावातील गिरासे कुळात दिलीप, प्रदीप, संदीप, रत्नदीप व चुलत बंधु जगदीश असे ५ हीरे जन्मले…परिस्थिती अतिशय बिकट पण कष्ट घ्यायची प्रचंड ईच्छाशक्ति आणि जिद्द! हीच जिद्द त्यांना मुळ गाव सोडुन ३५० मैलावरील नाशिक मध्ये घेऊन आली. आर्थिक भांडवल शुन्य पण कुटुंबातील एकजुट हेच सर्वात मोठं भांडवल. त्यातूनच नाशिकात त्यांनी ‘निलय’ इंडस्ट्रीज उभारली.१९९५ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर रोवलेला हे रोपटं ऊन वारा पाऊस सारं काही झेलून आज २५ वर्षाचं वटवृक्ष झालंय! १९८२-१९९५ नाशिक या अनोळखी शहरात अस्तित्वासाठी लढायचा हा काळ अन् या लढाईत यश देखील मिळवल या अवलियांनि!
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात कारला या गावी दिलीप, प्रदीप, संदीप, रत्नदीप आणि जगदीश या भावंडाचा जन्म झाला. वडिल अंबादास भिवसेन गिरासे शेतकरी तर आई फूलाबाई गृहिणी. वडिलांकडे २०० एकर कोरडवाहू जमीन; उत्पन्न मात्र अत्यल्प. दिलीप गिरासे यांचे शिक्षण गावात तर प्रदीप यांचे शिक्षण मामाकडे सालोरा खुर्द (माहुली जहागीर) येथे झाले. मामा भरतसिंह जाधव मुख्याध्यापक म्हणून जि.प.शाळा,सालोरा खुर्द येथे कार्यरत होते. या भावडांनी सुरूवातीला दुसNयाकडं मजुरी केली. वडिल बंधू दिलीप यांनी १९८१ ला आयटीआय केले आणि कामासाठी नाशिक गाठलं.

नाशिकात उभारला ‘निलय’उद्योग समुह
गिरासे बंधुनी १९८२ ला रितेश इंडस्ट्रीजमध्ये कामाला सुरूवात केली. करार पध्दतीने काम करायचे. दिलीप, संदीप व प्रदीप वंâपनीमध्ये दिवस-रात्र काम करायचं.१९८५ साली प्रथम निलय इंडस्ट्रीज च्या नावाने ३६ नंबरचा गाळा नाशिकात घेतला आणि इलेक्ट्रानिक्स पॅनल बनवायला सुरूवात केली. एका छोट्याशा वर्कशॉप पासुनचा हा उद्योग प्रवास आता निलय इंडस्ट्रीज, निलय मेटल इंडस्ट्रीज, इनाम कास्टींग, निलचंद्र अंबड इंडस्ट्रीज आणि रत्नदीप इंडस्ट्रीज अशा  पाच मोठे उद्योगात रूपांतर झाले आहे. आपल्या पोटा-पाण्याची सोय करत आज ६५० कामगारांना रोजगार दिला. नाशिकरत्न, कृषीरत्न, झी-अनन्य सन्मान, खांदेशरत्न अशा अनेक पुरस्कारांनी गिरासे बंधुचा सन्मान करण्यात आलेला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।