महाविकास आघाडीची शेगांव नगरपरिषद वर धाव

0
541
Google search engine
Google search engine

शेगाव:- महा विकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आज शेगावच्या नगरपरिषद मध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या कॅबिनमध्ये चांगलाच राडा घातला
शेगाव शहरांमध्ये दिवसा ढवळ्या सोनसाखळी व चोरीच्या खूप घटना घडल्या असून आज पर्यंत त्या चोरीच्या घटनांचा सुगावा लागलेला नसून दोन दिवसा अगोदर प्रगट स्थळ जवळ एका लहान मुलीच्या अपहरणाची अयशस्वी बातमी समोर आली होती वेळेवर स्थानिक लोकांनी लक्ष दिल्यामुळे ही दुर्घटना टळली
त्या उद्देशाने आज शिवसेनेचे संतोष घाटोळ, संतोष लिप्ते, दिनेश शिंदे, तसेच शैलेंद्र पटोकार,प्रफुल ठाकरे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मुख्यधीकारी शेगाव यांच्या कॅबिनमध्ये जाऊन प्रशांत शेळके
यांना चांगला चोप देण्याचा प्रयत्न केला, आणि शहरांमध्ये ०१ कोटी ५ लक्ष रुपये खर्च करून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे अशी विचारणा केली माहिती अशी की लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये जवळजवळ पन्नास कॅमेरे बंद असून सीसीटीव्हीचा ठेकेदार गोपाल पवार मागील एक वर्षापासून शेगावात परत आलाच नाही त्यामुळे असे म्हणावे लागते की “आपण यांना पाहिलंत का”? मुख्याधिकारी शेगाव यांना विचारले असता त्यांनी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करू असे सांगितले परंतु महत्त्वाची बाब ही की एक कोटी पाच लक्ष रुपयाचे हे काम होते आणि ठेकेदार जवळून फक्त वीस लक्ष रुपयाची अमानत रक्कम     (एफ डी) म्हणून नगरपरिषदेने स्वतः जवळ जमा ठेवलेली आहे पण काय खरोखर शहरात लागलेल्या कॅमेऱ्यांची इतकी रक्कम आहे?
का हा गूढ विषय आहे…