एकाचवेळी सैन्य दलात २३ युवकांच्या निवडीने आकोटात जल्लोष

0
1779
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

अखंड प्रहरी होऊन सिमांचे करणार रक्षण

ऊस देश कोई छु नही सकता… जिस देश के निगरबाह है आँखे…. भारतीय सैन्यात भर्ती होऊन देशसेवेची ईच्छा बाळगणाऱ्या आकोट तालुक्यातील २३ युवकांची एकाचवेळी निवड झाल्याने आकोट शहरातील राष्ट्रसेवेच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शहरातील टारगेट अॕकडामीचे प्रा.कैलास वर्मा यांनी या यशस्वी भावी सैनिकांचे ढोल ताशांच्या गजरात हार फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत केले.विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील १४ युवकांनी सैन्य सेवेसाठी यश मिळाले होते.अशी माहीती प्रा.वर्मा यांनी दिली

.राष्टसेवेचे हे भाग्य मोजक्या नागरिकांना लाभतं.अकोट तालुक्यातून १२ ते २३ आँक्टोबर दरम्यान तब्बल २३ देशप्रेमी युवकांना ही संधी चंद्रपूर येथे झालेल्या भर्ती प्रक्रियेत लाभली.हे युवक पात्रता परिक्षा व संपूर्ण प्रक्रियेत उतीर्ण झाल्याचा निकाल गत ११ फेब्रुवारीला जाहिर झाल्याचे समजते.आता हे युवक देशसेवेसाठी सज्ज झाले असून लवकरच अखंड प्रहरी होऊन सिमांचे रक्षण करणार आहेत.

 

यशस्वी जवांनामध्ये शुभम वानखडे,राहूल गवई,रविकांत कोल्हे,उज्वल आवारे,पवन अहीर,विशाल रेखाते,गौरव मिसाळ,रोशन घनबहाद्दूर,आदित्य अंबळकार,धनंजय कोगदे,पंकज पुंडकर,कोल्हे,महेश आगरकर,आकाश धांडे,विशाल धुळे,नावेद शहा,शेखर वाडीभसे,हरिश मंगळे,संकेत आवारे,आदर्श मोहोड,विवेक डोहाळे,करण बंकुवाले आदींचा समावेश असल्याची माहीती आहे.यातील अनेक युवक हे शेतकरी कुटुंबातील असुन खारपाणपट्यातील रहिवासी आहेत.या युवकांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.या नवसैनिकांची २९ फेब्रुवारीला वाजत-गाजत ढोल-ताश्यांच्या गजरात फेरी काढण्यात आली.

टार्गेटअॕकॕडमीच्या प्रा.वर्मा यांची अनोखी राष्ट्रसेवा

टार्गेट अॕकॕडमीचे प्रा.कैलास वर्मा गत १४ वर्षांपासून सैन्य भरतीतील यशस्वी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत.आजवर शेकडो विद्यार्थी त्यांचा अकादमीतून देशसेवेसाठी रुजू झाले आहेत.खासगी शिकवणी वर्ग घेऊनही सामिजीक बांधिलकी जपली आहे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहे