सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे यांची अमरावती ग्रामीण पोलीस मध्ये बदली ब्राम्हणवाडा थडी ,आसेगाव, चांदूरबाजार तिवसा या ठिकाणी विशेष कार्यवाहीमुळे चर्चेत

0
1892
Google search engine
Google search engine

सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे यांची अमरावती ग्रामीण मध्ये बदली

ब्राम्हणवाडा थडी ,आसेगाव, चांदूरबाजार तिवसा या ठिकाणी विशेष कार्यवाहीमुळे चर्चेत

अमरावती:-

सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे यांची बदली यवतमाळ इथून अमरावती ग्रामीण याठिकाणी करण्यात आली असून अमरावती ग्रामीण मध्ये त्यांची विशेष कामगिरी पाहता त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन मिळणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

अजय आकरे यांनी यशस्वी कारकीर्द मध्ये पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोवंश तस्करी तसेच अवैध दारू अवैद्य इंग्रजी दारूवर कार्यवाही केली होती. सागवान तस्करी व सुद्धा धडक कारवाईमुळे ते ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनमध्ये चर्चेत आले होते .

त्यानंतर त्यांची बदली चांदुर बाजार याठिकाणी करण्यात आली चांदुर बाजार याठिकाणी सुद्धा त्यांनी अनेक अवैध वाहतूक करणारे तसेच अवैध वाळू वाहतूक गांजा विक्री वरली मटका यावर कारवाई केली होती तर त्यांच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर त्यांची बदली आसेगाव पोलिस स्टेशन ला करण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अवैधपणे होत असलेल्या वाळू तस्करी तामसवाडी वाळू घाट मधून जवळपास लाखो रुपयांची मुद्देमाल जप्त केला होता.अवैध शासकीय धान्य विक्री करणाऱ्या सुद्धा त्यांनी धडक कार्यवाही केली होती. वाळू आणि चोरीला गेलेल्या वाहने जप्त केली होती .या ठिकाणीसुद्धा ते मुरलीधर महाराज यांच्या प्रकरणामुळे अजय आकरे अधिक चर्चेत आले होते.

आसेगाव पोलिस स्टेशन हद्दीतून होणार्‍या अनेक अवैध व्यवसायांना त्यांनी लगाम लावला होता त्यानंतर त्यांची बदली कृषी उत्पन्न बाजार समिती येथील झालेल्या अवैध विक्री आयपीएस समीर शेख यांच्या कारवाईनंतर त्यांचा परिक्षाविधीन कालावधी संपल्यावर अजय आकरे यांची बदली चांदुर बाजार चे ठाणेदार म्हणून करण्यात आली.

अवैध वाळू तस्करी अवैध दारू वाहतूक करणारे यांना आपल्याला कार्यवाहिमुळे त्यांनी अनेकांना दमछाक करून सोडले तर अधिक जास्त चर्चेत देखील राहिले.त्यानंतर त्यांची बदली तिवसा याठिकाणी करण्यात आली .या ठिकाणी त्यांनी बोगस अपंग प्रमाणपत्र तसेच महामार्गावर होत असलेली अवैध दारू वाहतूक त्यावर कारवाई केली त्यामुळे ठाणेदार म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द आणि कामाचा संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू होती.

काही महिन्याच्या कालावधी त्यांची बदली यवतमाळ याठिकाणी झाली असताना देखील त्यांची अमरावती जिल्ह्यातल्या चर्चा होत होती.मात्र त्यांची बदली अमरावती ग्रामीण मध्ये झाली असताना त्यांना वरिष्ठ कोणत्या पोलीस स्टेशनची धुरा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर अजय आकरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अवैध धंद्यांना करणाऱ्यांना घाम फोडला हे मात्र तितकेच खरे त्यांचा पोलिस स्टेशनमधील स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर एक शिस्त आणि काय जबाबदारीचे चांगलेच धडे दिले. याबरोबरच अनेक कर्मचारी अधिकारी यांनी धास्ती घेतली आहे.

अजय आकरे यांनी आपल्या चार पोलीस स्टेशन कारकीर्द मध्ये जवळपास 500 गौवंश यांची सुटका केली तर यापैकी काही गौवंश यांचा मृत्यू देखील झाला.तर गौमास विक्री आणि गुटखा वर देखील त्यांनी यशस्वी कार्यवाही केली.जुगार मध्ये सुद्दा त्यांनी अनेक कार्यवाही केली तर बँक फसवणूक प्रकरण मध्ये देखील त्यांची कार्यवाही अधिक काळ चर्चेत राहिली होती. यामध्ये परतवाडा येथील नामांकित वकील याना त्यांनी अटक केल्यानंतर त्यांच्या या कार्यवाहिमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वकील संघटना यांनी एक दिवशीय संप पुकारला होता.