धुम स्टाईल स्टंटबाज वाहनचालकांना शहर वाहतूक शाखेचा झटका

0
1352

अकोलाःसंतोष विणके


2 महिन्यात तब्बल 1700 चारचाकी वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाई

शहर वाहतूक शाखे द्वारा वेगाने धुम स्टाईल वाहने चालवुन टपोरीगिरी करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली असून या मोहिमेअंतर्गत ६० दिवसात १७०० जणांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. चालू वर्षातील जानेवारी व फेब्रुवारी ह्या 2 महिन्यात शहर वाहतूक शाखेने नवीन इंटर सेप्टर वाहनातील स्पीडगण चा उपयोग करून तब्बल 1700 कारवाया केल्या आहेत. या धडक मोहिमेत चारचाकी वाहनचालकांनी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे वाहतुक शाखेने टपोरी गिरी करणारे, चालू वाहनांवर स्टंटबाजी करणारे, वेगाने धुम स्टाईल वाहन चालविणारे, मोटरसायकल वर क्रमांक टाकण्याचे ऐवजी भलतेच काही लिहणारे वाहन चालक हेरून त्यांचेवर कारवाई करण्याचा व वेळप्रसंगी त्यांचे वाहन ट्राफिक ऑफिस ला जमा करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे,

अकोला शहरात जवळपास सर्वच प्रमुख रस्ते ,ज्या मध्ये नेकलेस रोड, नेहरू पार्क ते अशोक वाटिका ते अग्रसेन चौक, अकोट स्टँड ते शिवाजी महाविद्यालय , ह्या रोडची विकास कामे सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेची वाहतूक सुरळीत ठेवण्यात जास्त मनुष्यबळ खर्ची पडते, तरी सुद्धा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून टपोरी गिरी व स्टंट बाजी करणारे वाहन चालक, मोटारसायकल वर क्रमांक टाकण्या ऐवजी भलताच मजकूर लिहणारे, कागदपत्रे जवळ न बाळगणारे, नो पार्किंग मध्ये वाहन उभे करणारे, ट्रिपल सीट तसेच धावत्या वाहनांवरमोबाईल वर बोलणाऱ्या वाहन चालकांवर धडक कार्यवाही करून दोन महिन्यात जवळपास 9000 वाहन चालकांवर कार्यवाही करून जवळपास 12 लाख दंड वसूल केला आहे, अशी धडक मोहीम सुरूच राहणार असून सध्या परीक्षेचे दिवस असल्याने पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केली आहे.