गर्भाशयमुख कर्करोग व पँपस्मिअर तपासणी शिबीराचे आयोजन

0
1114
Google search engine
Google search engine

मराठा महिला मंडळाचा उपक्रम

अकोट,ता.प्रतिनीधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक गिताई हॉस्पिटल व मराठा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १ते ८ मार्च सकाळी ११ ते पाच वाजेपर्यंत गर्भाशयमुख कर्करोग व पँपस्मिअर तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबीराचा लाभ ३० वर्षावरील महिलांनी अल्पदरात तपासणी करुन घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.या शिबीराचे उदघाटन रविवारी,एक मार्चला डॉ.पुष्पा वालसिंगे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिना बोरकर होत्या.शिबीरात डॉ.वालसिंगे यांनी महिलांविषयक आजारांची लक्षणे,निदान,उपचार पध्दती आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा.मेघना पोटे यांनी केले.आभार उज्वला भिसे यांनी मानले.

रुग्ण महिलांनी त्यांच्या नावाची नोंदणी अकोटच्या मराठा महिला मंडळात करावी;त्यासाठी ९२८४७०७५५१,९७६३६०७४४५,८९९९७४१६२४,९७६७३९७२६६ या भ्रमणदूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.