कर थकबाकीदारांची नावे झळकणार मुख्य चौकात

0
911
Google search engine
Google search engine

अकोट नगरपरिषदेकडून करवसुली पथके तैनात

आकोटः ता.प्रतिनिधी

अकोट नगरपरिषदेद्वारा प्रभावी कर वसुली मोहीम राबवणे सुरु आहे.पालीकेच्या मालमत्ता कराची मागणी तसेच थकबाकी 5 कोटींच्या घरात आहे. सदर कराची थकबाकी मार्च अखेर पर्यन्त वसूल करण्याचे आव्हान नगरपरिषद समोर आहे. कर वसुली साठी सर्व मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. सदर नोटिसा ना प्रतिसाद देऊन कराची रक्कम न भरल्यास थकबाकी दारांचे नावे मुख्य चौकात फलकावर झळकविण्यात येणार आहेत.
सद्या नगरपरिषदेच्या वतीने विशेष कर वसुली पथक तयार करण्यात आलेले. कर वसुली मोहिमेअंतर्गत बडया थकबाकी दाराना नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत

.ज्यामध्ये बडे हॉटेल मालक,मंगल कार्यालय,ऍग्रो मिल,हॉस्पिटल, मोठं मोठे दुकान यांचा समावेश आहे.ज्या मालमत्ता धारकांनि नोटीसा घेण्यास नकार दिला आहे त्यांच्या मालमत्तेवर नोटिसा चिकटवून कर न भरल्यास मालमत्तेवर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी कर वसुली भरून सहकार्य करावे असे आवाहन न.प.अकोट चे मुख्याधिकारी श्री.दादाराव डोल्हारकर यांनी केले आहे.