कडेपूर येथील संपतराव देशमुख सोसायटी अध्यक्षपदी धनाजी यादव : उपाध्यक्षपदी सागर यादव यांची बिनविरोध निवड

सांगली/कडेगांव न्युज

सांगली जिल्ह्यातील कडेपूर (ता.कडेगाव) येथील कै.आमदार संपतराव देशमुख विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी धनाजी शिवाजीराव यादव आणि उपाध्यक्षपदी सागर विलासराव यादव यांची बिनविरोध निवड झाली.
सदर संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जी.व्ही मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी नूतन संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. अध्यक्षपदासाठी धनाजी यादव आणि उपाध्यक्ष पदासाठी सागर यादव यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे नेते सतीशराव यादव यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष धनाजी यादव म्हणाले, नेते मंडळी आणि सभासदांनी मला सलग तिसर्यांदा अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्यास अधिनराहून प्रामाणिकपणे काम करणार आहे. संस्थेची सध्या वार्षिक उलाढाल ८७ लाख रुपये आहे. यापुढील काळात सभासद संख्या वाढवून संस्थेची उलाढाल एक कोटी रूपये करण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी माजी उपसरपंच शाहीर यादव, चेअरमन भीमराव यादव, जयवंत मोहिते, तुळशीराम यादव, बबन यादव, गणेश यादव, विजय यादव यांच्यासह सर्व संचालक, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिव राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले.