ग्रामपंचायत निवडणूक साठी प्रक्रिया सुरू तर जात पळतानी प्रमाणपत्र मुळे उमेदवार यांची तारांबळ

0
930
Google search engine
Google search engine

ग्रामपंचायत निवडणूक साठी प्रक्रिया सुरू तर जात पळतानी प्रमाणपत्र मुळे उमेदवार यांची तारांबळ

चांदूरबाजार/ प्रतिनिधी

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी, राज्य निवडणूक आयोगाचे निदेर्शानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत ६ मार्च पासुन ग्रा. पं. सदस्य पदासाठी, नामांकन अर्ज स्वीकारने स्थानिक तहसिल कार्यालयात सुरू झाले आहेत. पहिल्या दिवसी एकाही अजार्ची उचल, तसेच दाखलही झाला नाही. परंतु, इच्छूक उमेदवारांची व निवडणूक होऊ घातलेल्या बहुतांश गांवातील ‘पॅनल’ चालक नेत्यांची, निवडणूक अर्जासोबत लागणारे कागदपत्रे याबाबत माहिती घेण्या साठी एकच गर्दी तहसील कार्यालयात झाली. यावेळी नामनिर्देशन पत्रासोबत , जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती मिळताच अनेक इच्छूकांचा भ्रमनिरास झाला.

ग्रामपंचायत निवडणूकीची प्रक्रिया सुव्यस्थित पार पडावी यासाठी, सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार, तसेच स्थानिक निवडणूक अधिकारी, विकास मीना यांचे मार्गदर्शना खाली ११ निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तीन ते चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना, एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ही मदतनीस म्हणून देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच त्यांच्याकडे असणार्‍या निवडणूक होणार्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत.

१) निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र मानकर तथा स.नि. नि.अधिकारीआशिष काळे यांचे कडील ग्रामपंचायती, शिरजगांव बंड, खरवाडी, खराळा,बेसखेड या प्रमाणे आहेत. २) नि.नि.अधिकारी गजानन दाते, तथा स.नि. नि. अ. ा्रतिक चव्हाण, याचे कडे दहीगांव पूर्णा,, विरूळ पूर्णा, आसेगांव, कृष्णापूर या ग्रामपंचायतीआहेत. ३)नि. नि. अ. देवानंद दौंड,तथा स. नि. नि. अ. एम. एस. मंगळे यांचे कडे, कुरळ पूर्णा, फुबगांव, सफार्बाद, राजणा. इत्यादी ग्रा. पं. ४)नि.नि.अ.हनुमान सिडाम तथा स. नि. नि. अ. विजय गणोरकर यांच्याकडे, वणी, कुरणखेड निमखेड, जालनापू, इत्यादी ग्रां. पंचायती. ५) नि.नि.अ. आर .आर. व्यवहारे तथा स. नि. नि. अ. यांच्याकडे, माधान, देऊरवाडा, काजळी, शिरजगाव कसबा या ग्रामपंचायती. तसेच ६) नि.नि.अ.दीपक शिंगाडे तथा स.नि.नि.अ.नितीन खांबलकर यांचे कडे, ब्राम्हणवाडा थडी, विर्शोळी, ब्राम्हणवाडा पाठक. ७) नि.नि.अ.एम.ए.विंचूरकर तथा स.नि.नि.अ.एन. एन.घुलक्षे यांचे कडे,कुर्हा, करंजगाव,कारंजा बहिरम. ८)नि.नि.अ.नरेश चवणे तथा स.नि.नि.अ.किरण बुल यांचे कडे, थुगांव, पिंपरी,जसापूर या ग्रामपंचायती.९)नि.नि.अ.ए.एन.भुजाडे तथा स.नि.नि.अ.अमित गाटके यांचे कडे, तोंडगांव, तळेगांव मोहना, तुळजापूर गढी, हिरुर पूर्णा या ग्रां. पंचायती. १0)नि.नि.अ.सुनील गवई तथा स.नि.नि.अ.मनिष टेंभरे यांचे कडे, नानोरी, सोनोरी, राजुरा, सुरळी इत्यादी ग्रामपंचायती. ११)नि. नि. अ. भाऊ अवसरमोल तथा स.नि.नि.अ.संजय येऊतकर यांचे कडे, जवळा शहापूर, वडूरा, बोराळा, वाठोंडा इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे, तालुक्यातील निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा , निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम नुसार ग्रामपंचायत निहाय निवडणूकीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तरी इच्छूक उमेदवारांनी संबंधित ग्रामप.चायत, निवडणूक निर्णय अधिकारी याचेशी निवडणूक प्रक्रिये संबंधाने संपर्क साधावा.अशी माहिती स्थानिक सहायक निवडणूक अधिकारी अर्जून वांदे यांनी दिली.