माधान ते काजळी रस्ता झाला जीवघेणा जडवाहतुकमुळे रस्त्यावर गिट्टी विखुरली; वाहतुकीस अडथळा,अपघाताची शक्यता

0
478

माधान ते काजळी रस्ता झाला जीवघेणा जडवाहतुकमुळे
रस्त्यावर गिट्टी विखुरली; वाहतुकीस अडथळा,अपघाताची शक्यता

चांदुर बाजार

बहिरम ते चांदुर बाजार या मार्गाने जडवाहू वाहने ओव्हरलोड गिट्टी,मुरूम,वाळू भरून जाताना असल्याने ठीक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून काही ठिकाणी रोड घराब झाला असून गिट्टीचा वर आली आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहे संबंधित वाहतूकीवर निबर्ंध लावावा, अशी मागणी नागरिकांची आहे.

1वर्ष पासून या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात मुरूम,वाळू ची येथून ट्रक ओव्हरलोड भरती करून जात आहे.त्यामुळे रस्ता घराब होऊन त्यामुळे दुचाकी वाहन चालक त्रस्त आहे.
या संदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग याविषयी टाळाटाळ करण्यात येत आहे. या मार्गाने नियमित वाळू आणि मुरूम वाहतूक करणार्‍या ट्रकची वर्दळ असते.

काजळी माधान चांदुर बाजार या मार्गाची मोठय़ा प्रमाणात चाळणी झाली असल्याने दुचाकी वाहन चालक हैराण आहे रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे दुचाकी चालक घसरून अपघात नियमित होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष होत आहे.