चाकूने वार करून हत्या करणारे आरोपी अखेर जेरबंद, पोलिसांन समोर आव्हान, शहरातील वाढती गुन्हेगारी कशी रोखणार? मध्यरात्री पर्यत असते अवैध धंदे करणारे यांची रोडवर वर्दळ

0
1270
Google search engine
Google search engine

चाकूने वार करून हत्या करणारे आरोपी अखेर जेरबंद,
पोलिसांना समोर आव्हान, शहरातील वाढती गुन्हेगारी कशी रोखणार?

चांदूर बाजार /प्रतिनिधी

शहरात बुधवारी रात्रभर चौकात मामाने भाच्याची हत्या केली. या हत्येतील दोन्ही आरोपींना स्थानिक पोलिसांनी ५ मार्चला अटक केली. या आरोपींना ६ मार्चला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ मार्चपयर्ंत पीसीआर दिला आहे. तर या हत्येमध्ये वापरण्यात आलेले पिस्तुल आरोपीकडे कोठून आले, याचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.बुधवारी रात्री शहरातील ललित कॅफे मध्ये घरगुती वादातून मो एजाज ची हत्या झाली. या हत्येतील मुख्य आरोपी अब्दुल गणी व सय्यद अरमान याना पोलिसांनी गुरुवारी ब्राम्हणवाडा थडी येथून अटक केली .दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येत पिस्तूलाचा वापर करण्यात आला .पिस्तुलातून झाडलेल्या गोळी चे काडतूसही ,पोलिसांनी घटनास्थळ वरून ताब्यात घेतले आहे. परंतू या हत्येत वापरलेले पिस्तूल आरोपीकडे कोठून आले, याचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान ठरणार आहे. मागिल काही दिवसात तालुक्यात वाढती गुन्हेगारी पाहता ,अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा धाक संपला आहे.अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत .तीन महिन्यात तीन हत्या , स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीत झाल्या आहे. तसेच ऑटोचालकाची हत्या तर, चक्क पोलिस स्टेशनच्या दारातच झाली असल्याची घटना ताजी आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सह गुन्हेगारी वाढली आहे. भरचौकात पिस्तूल चा वापर करून हत्या करण्याची तालुक्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्य हादरून गेला आहे. चांदुर बाजार तालुका हा मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असल्याने, मध्य प्रदेशातील अवैध व्यवसाय करणार्‍यांची तालुक्यात नेहमीच रेलचेल असते. यात वाळू माफिया, अवैध जनावर वाहतूक करणारे, सह सागवान तस्कर सारखे अवैध व्यावसायिकांशी तालुक्यातील काही गुंड प्रवृत्तीचे लोकांचा मोठा संपर्क आहे. मध्यप्रदेश मधील या अवैध व्यवसायीका कडून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिस्तुलासह, देशी कट्टे व निरनिराळ्या शस्त्रांची सुद्धा तस्करी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या हत्येत उपयोग करण्यात आलेल्या पिस्तुलचा शोध पोलिसांच्या विशेष पथकाकडून घेऊन ,प्रकरणाच्या मुळापयर्ंत जाणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक व होळीच्या सणाची धामधूम आहे. अशातच भरचौकात हत्येकरिता पिस्तूलाचा वापर होणे अत्यंत धोकादायक आहे.कारण चांदूरबाजार तालुका हा अत्यंत संवेदनशील आहे. याची नोंद गृहमंत्रालयाचे दप्तरी आहे. हे विसरून चालणार नाही. मागिल तीन महिन्यात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटना पाहता, पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाट कमी झाला असे स्पष्ट पुणे दिसून येते. याचा गांभीर्याने विचार वरीष्ठ पोलिस प्रशासना कडून होणे गरजेचे