जागतिक महिला दिनी ‘ती’ ने सांभाळली अकोल्यातील वाहतूक व्यवस्था

0
1226
Google search engine
Google search engine

NCC लेफ्टनंट प्रा.श्वेता मेंढे बनल्या वाहतूक निरीक्षक

अकोलाः संतोष विणके

अकोला शहरवासीयांना आजची सकाळ काहीशी सुखद व कुतूहलाची ठरली. कारण होते शहरातील चौकाचौकात वाहतूक व्यवस्था सांभाळतांना दिसलेल्या युवती व महिला.जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी हा अभिनव प्रयोग राबविला. जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्था एनसीसी व आर एस पी च्या महिला कॕडेटस् ने सांभाळली. तर संपूर्ण शहराच्या वाहतूक शाखेची धुरा NCC लेफ्टनंट श्वेता मेंढे यांना पोलीस खात्याद्वारा द्वारा वाहतुक निरीक्षक म्हणुन बहाल करण्यात आली होती.

.या उपक्रमात जवळपास 60 मुली व त्यांचे शिक्षकांसह स.9ः30 वाजता शहर वाहतूक विभागाचे कार्यालयात त्यांना जा.महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वाहतूक पोलिसांच्या कामकाज विषयी शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी माहिती दिली. तसेच शहरातील प्रदूषण व इतर बाबीचा विचार करून सर्व मुलींना मास्क चे वाटप करण्यात आले.

मुलींना कर्मचाऱ्यासह पोलीस वाहनाने शहरातील प्रमुख चौक नेहरूपार्क चौक, हुतात्मा, भगत सिंग, धिंग्रा, अशोक वाटिका, सिव्हिल लाईन, रतनलाल प्लॉट, पोस्ट ऑफिस, टॉवर ह्या महत्वाच्या चौकातील वाहतूक पोलीस सोबत त्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच e चलन मशीन द्वारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही वाहतूक पोलिसांनी करून घेतली, तसेच वाहतूक शाखेला प्राप्त नवीन इंटरसेप्टर वाहना तील स्पीडगण कसे काम करते ह्या विषयी महिला शिक्षकांना व मुलींना माहिती देण्यात आली,

ह्या वेळी NCC मध्ये लेफ्टनंट पदावर असलेल्या आर डी जी महिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालक प्रा.श्वेता मेंढे ह्यांना वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून प्रभार देऊन कामकाजा विषयी माहिती देण्यात आली. प्रत्येक चौकात जाऊन वाहतूक पोलिसांचे काम कसे चालते ह्या बाबत त्यांनी माहिती घेऊन चौकात वाहतूक नियंत्रण करीत असलेल्या NCC व RSP च्या मुलींचा उत्साह वाढविला.

ह्या वेळी त्यांचे सोबत शिवाजी महाविद्यालया च्या NCC प्रमुख प्रा डॉ.अश्विनी बलोदे, RSP च्या न्यू इंग्लिश स्कुल च्या शिक्षिका अर्चना रंजनकर ह्याची सुद्धा उपस्थिती होती, या उपक्रमात शिवाजी कॉलेज व आरडीजी कॉलेजच्या NCC महिला कॅडेट व डी आर पाटील विद्यालय व न्यू इंग्लिश स्कुल च्या RSP च्या 60 मुली सहभागी झाल्या होत्या

. ह्या कामी न्यू इंग्लिश स्कुल चे श्रीकांत रत्नपारखी, नंदकिशोर थोटे, व डी आर पाटील विद्यालयाचे अशोक नांदूरकर ह्या शिक्षकांनी सहकार्य केले, जागतिक महिला दिनी प्रत्यक्ष पोलिसांच्या कामात सहभागी करून घेतल्या बद्दल सर्व मुलींनी समाधान व्यक्त करून पोलीस प्रशासनास धन्यवाद दिले.

खडतर क्षेत्रातही आत्मविश्वासाने महीला काम करु शकतात – गजानन शेळके,वाहतुक निरीक्षक

महिला कोणत्याही क्षेत्रात आव्हानात्मक काम करू शकतात हा विश्वास जागविण्या साठी तसेच वाहतूक पोलिसांची ड्युटी किती कष्टाची व कठीण आहे हे मुलींना समजावे व पोलिसांविषयी त्यांचे कामाप्रति आदराची भावना वृद्धिंगत व्हावी.याकरीता उपक्रम राबवण्यात आला. तसेच एक आम नागरिक म्हणून वाहतूक नियमा ची माहिती व्हावी आदी विविध जाणिवेतून NCC व RSP कॕडेटसच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबवत महालांना वाहतूक नियंत्रण हा सारख्या खडतर क्षेत्रातही आत्मविश्वास मिळावा म्हणून राबविण्यात आला.