नियंत्रण कक्षाला माहिती होते मात्र स्थानिक पोलिसांना का नाही? 146 जनावर ची माहिती चांदुर बाजार पोलिसांना का नाही मिळाली?

0
677
Google search engine
Google search engine

नियंत्रण कक्षाला माहिती होते मात्र स्थानिक पोलिसांना का नाही?
146 जनावर ची माहिती चांदुर बाजार पोलिसांना का नाही मिळाली?

अमरावती/चांदुर बाजार

दिनांक 7 मार्च च्या मध्यरात्री अमरावती ग्रामीण अधीक्षक यांच्या कार्यलाय मधील नियंत्रण कशाला माहिती मिळते की चिंचोली काळे मार्गे अवैध पणे गौवंश यांची पायदळ आणि अमानुष पणे वाहतूक होते आहे.त्या आधारे ते स्थानिक चांदुर बाजार पोलिसांना संपर्क करून यांची माहिती देते आणि चांदुर बाजार पोलीस कार्यवाही करते मात्र या ठिकाणी जर नियंत्रण कक्ष वरून संपर्क झाला नसता तर त्या गौवंश चे काय झाले असते हा प्रश उभा राहत आहे.तर कुंपण च शेत गिळत नसल्याची चर्चा सुरू आहे.

चांदुर बाजार तालुका हा मध्यप्रदेश सीमेला लागून असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चे घर समजले जाते .त्यात पोलीसांनी वेळीच दखल न घेतली जात असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती चे लोकांची संख्या अधिक जात वाढत आहे.यामुळे समाजातील वातावरण अधिक दूषित होते आहे.तर चांदुर बाजार पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांची अवैध धंदे वाल्या सोबत हितसंबंध असल्याची चर्चा चांदुर बाजार शहरात चर्चात्मक ठरत आहे.

दिनांक 7 मार्च नियंत्रण कक्ष यांच्या संपर्क नंतर हे समजणे सोपे झाले आहे की चांदुर बाजार तालुक्यातून अवैध पणे गौवंश वाहतूक ही अधिक जास्त प्रमाणात सुरू असून आपल्या काही आर्थिक लाभासाठी कर्मचारी आणि अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी या सर्व घटनाक्रम कडे की सकारात्मक होऊन आपली कार्यवाही करतील हा प्रश्न सध्या शहरात चर्चेत आहे.