सेदाणी इंग्लीश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला स्त्री जीवनातील कार्यकर्तृत्वाचा इंद्रधनुष्य

0
544
Google search engine
Google search engine

जागतिक महिला दिनानिमित्य स्त्री कर्तृत्वाचा जागर

अकोटःता.प्रतिनिधी

स्थानिक लेट दिवालीबेन सेदाणी इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन पुर्वसंध्येला दि.७ मार्च रोजी अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांनी स्त्री संघर्षाच्या कार्याचा लेखाजोखा मांडत समाजातील विविध क्षेत्रात आपले कार्य कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रियांच्या यशाचा मूलमंत्र सांगणारे धमाकेदार सादरीकरण केले.या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना स्त्री जीवनातील इंद्रधनुषी रंगाची यशोशिखरे उलगडून दाखवण्यात आली.

सार्वजनिक जीवनात महत्त्वाच्या पदावर कार्य करणाऱ्या व अद्वितीय महिलांच्या कार्याचे विचार मंथन या कल्पक सादरीकरणातुन दाखवण्यात आले.सादरीकरणाला विविध सामाजिक संदेशांची जोड देण्यात आली होती.याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी प्राचार्य विजय भागवतकर मुख्याध्यापक प्रशांत मंगळे,प्रा. मुख्याध्यापिका स्नेहल अभ्यंकर, सांस्कृतिक प्रमुख सौ जयश्री महाजन, रंजना इंगळे यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा सौ. स्मिता सेदाणी लाभल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली स्वागतसमारंभानंतर स्नेहल अभ्यंकर,शीतल खारोडे,चंचल पितांबरवाले यांनी मनोगतं व्यक्त केलीत तर कल्याणी गुजर व रोहिणी अस्वार या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. तत्पश्चात विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

यानंतर मंचावर इंद्रधनुषी सादरीकरणातून स्त्री जीवनातील विविध भावविश्व दर्शवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भास्‍कर यांनी तर आभारप्रदर्शन जमील शेख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.