अकोली जहागीर येथे जागतिक महिला दिन उत्साहात

0
724
Google search engine
Google search engine

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

आकोटः प्रतिनिधी

अकोली जहागीर येथे नेहरू युवा केंद्र अकोला नेहरु युवा मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी सरपंच सौ रोशनी मून तर अकोट ग्रामिण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे व विजय साबळे,उपसरपंच अशा बघिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कर्तुत्ववान महिला म्हणून संगीता ढेमरे यांचा मंडळाच्या मार्फत सत्कार करण्यात आला व बचत गटातर्फे लिलाबाई दातीर दीपा वाळके सुनिता धर्मे, वैशाली गोतमारे,संगीता वाळके, लता दुधे,शितल शेंडे, मेघा जवंजाळ, अनुराधा वाळके, रमा रणगिरे, शुभांगी बहादुरे, शबाना शकुर यांचा सत्कार करण्यात आला. अंगणवाडी केंद्रामार्फत अलका तिडके यांनी शपथ पत्राचे वाचन केले.

महिला जागृती वर नंदिनी घोळीते लता डांगटे यांनी मनोगत व्यक्त केले ठाणेदार फड यांनी सामाजिक कार्यात महिलांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती करून आकाश भरारी घ्यावी असे आवाहन केले. प्रस्ताविक राजेश डांगटे संचालन जयश्री मेहरे यांनी केले कार्यक्रमाला नेहरू युवा मंडळ अध्यक्ष अनंत सरोदे सचिव वैभव आवंडकर किशोर धुळे ऋषिकेश लाहोरे सुरज डांगटे अभिषेक गणगणे सागर ठाकरे चेतन खंडेराय यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला गावातील बचत गटाचे सदस्य अंगणवाडी सेविका आशा सेविका यांची उपस्थिती होती.