ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची यशस्वी कार्यवाही ,गावठी दारू चा अड्डा केला उध्वस्त, दोघांना वर गुन्हा दाखल

0
820
Google search engine
Google search engine

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची यशस्वी कार्यवाही ,गावठी दारू चा अड्डा केला उध्वस्त, दोघांना वर गुन्हा दाखल

चांदुर बाजार :-

मागील काही दिवसांपासून ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा व्यवसाय हा ग्रामीण भागात फोफावला होता.यात पोलिसांच्या कार्यवाही करण्यासाठी आज दिनांक 8 मार्च ला दुपारी 4 च्या दरम्यान मध्यप्रदेश ते महाराष्ट्र सीमेवर अवैध पणे असलेलता गावठी दारूचा अड्डा उदवस्त केला आहे.

ब्राम्हणवाडा थडी व मध्य प्रदेश हद्दीवरील पुर्णा प्रकल्पाचे बॅकवाॅटर परीसरात अवैध गावरान दारुच्या भट्टीवंर रेड करुन एकुन २६,०००/- रु किंमतीचा प्रोहीबीशन माल पोलिसांनी नष्ट केला.दोन आरोपींवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करीत करण्यात आले आहे. यामध्ये मानिराम जांभुरकर रा.विसरोळी आणि गणेश लोखंडे रा.विषरोळी यांच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी फरार झाले आहे.

ही कार्यवाही ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सहा पो नि सचिनसिंग परदेशी,सहा पो उपनि मंगला सानप,पो हवा किसन सपाटे,पो ना राजेश वासनिक,म पाे काॅ अंजली,पो काॅ महेंद्र राऊत, संदीप खांडेकर यांनी केली.

बॉक्समध्ये
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमेलगत अनेक अश्या गावठी दारूचे अड्डे आहे.यामध्ये ब्राम्हण वाडा एक अड्डडा उदवस्त केला.प्राथमिक माहिती वरून या ठिकाणी हा व्यवसाय खूप दिवसा पासून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.