आकोट शहर पो.स्टे.मध्ये महीला गौरव

0
914

संघर्षाशी लढणाऱ्या महीलांचा गौरव…

आकोटः संतोष विणके

जा.महीला दिना निमित्य अकोट शहर पोलीस स्टेशन येथे संघर्षातुन स्वताचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या कर्तबगार महीलांचा गौरव करण्यात आला.

तसेच महीला दिना निमित्य पो.स्टे.चा प्रभार ए.पी.आय. विल्हेकर मँडम यांना दिला. यावेळी महीला अधिकारी व महिला कर्मचारी ए.पी.आय.विल्हेकर ए.पी.आय.पाटेखेडे, महिला कर्मचारी,संगिता वडनेरकर,उषा सिरसाट,उमा बुटे,दिपाली देशमुख,सुनिता डाहे,पुजा वानखडे,यांचा सत्कार करण्यात आला

.तसेच सौ.सुर्यकांता महादेवराव खडेकार ह्या मुलगी,मुलगा दोन्ही अंध आहेत त्यांना सांभालून मोलमजूरी करून घर चालवितात.त्यांचा संघर्षपुर्ण जिद्दीच्या लढाईला बळ मिळावं म्हणुन त्यांचा साडीचोळी पुष्पगुष्छ देऊन गौरव करण्यात आला.तर महिला समीती सदस्य सौ.मायाताई म्हैसने व सुमेरा अमन यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.