सेदाणी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली “दुर्गुणांची होळी”

0
659
Google search engine
Google search engine

अकोटःता.प्रतिनिधी

स्थानिक लेट दिवालीबेन सेदाणी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनोखी होळी साजरी केली. होळी हा सण दुर्गुणांच्या दहणासाठी ओळखला जातो.प्राचीन कथांनुसार होळीत दुर्गुणांची राख तर खरे पणाचे तेज कायम राहते हेच शास्त्र विद्यार्थ्यांना जीवनात आयुष्यभर लाभावे या भावनेतून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम साजरा केला

. विद्यार्थ्यांनी आपल्यातील वाईट सवयी व दुर्गुण एका कागदावर लिहून या वाईट सवयी व दुर्गुणांना कायमचे सोडून जावेत म्हणून त्यांचे होळीत दहन केले. तसेच होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी व्हावी म्हणून परिसरातील झाडांची वाळलेली पाने गोवऱ्या, निष्पर्ण झाडांच्या फांद्या गोळा करून होळी पेटवली.

 

यावेळी विद्यार्थ्यांनी होळीचे पूजन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. दुर्गुणांच्या होळीचा हा उपक्रम संस्था अध्यक्षा सौ स्मिता सेदाणी प्राचार्य विजय भागवतकर मुख्याध्यापक प्रशांत मंगळे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका स्नेहल अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी साजरा केला.