गुरुदेव भक्तांनी राबवली ग्रामसुधार स्वच्छता होळी

0
523
Google search engine
Google search engine

 

सिरसोलीत ग्रामसफाई करून केली कचऱ्याची होळी

आकोटः संतोष विणके

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिरसोली येथे गुरुवंदन सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थेतर्फे
ग्रामसफाई करुन होळी पेटवण्यात आली.

संस्थेतर्फे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
गावातील सर्व तरुण लोक एकत्रित येऊन
जमा झालेला काडीकचरा गोळा करतात आणि होळीचा सण साजरा करतात ।या उपक्रमाचा उद्देश
वृक्षतोड कमी करणेे ,त्याचबरोबर प्रदूषण कमी करणे ,आणि या उद्देशाने ग्राम स्वच्छता होऊन गावांमधील जंतूंचा नाश होऊन रोगराई कमी व्हावी असा प्रयत्न असतो.

कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे अश्या विषाणूजन्य आजारापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे. त्याकरिता स्वच्छतेची होळी हा सामाजिक प्रकल्प संस्थेने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राबावलेला आहे.

या उपक्रमाला समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज त्याचबरोबर त्यांचे बंधू गजानन चिंचोळकर मुलगा डॉ.धर्मपाल चिंचोळकर
सुनील कुमार,पियुष ,नितीपाल,ऋषीपाल महाराज,गजानन चिंचोळकर ,संतोष अनासने, अशोक अनासाने, गणेश चिंचोळकर यांच्यासह
गावातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक उपस्थित होते.सर्वांनी पूर्ण गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवून
उपक्रमांमध्ये सहभाग घेतला