विदर्भाचे देहू श्री क्षेत्र कालवाडीत संत तुकाराम बीजेचा भक्तीसोहळा

0
702
Google search engine
Google search engine

ग्यानबा तुकाराम जयघोषाने दुमदुमली संतवाडी

आकोटः संतोष विणके

आकोट येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी ला संत तुकाराम बीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. बीजेला गावोगावच्या भक्तगणांनी संत दर्शनार्थ गर्दी केली होती

गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे प्रेरणा व वै पंजाबराव हिंगणकर यांचे पुढाकाराने तुकाराम महाराजाचे पहीले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांत अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.येथे गत ३७ वर्षापासून येथे बीजेचा सोहळा संपन्न होत आहे.
बीजे निमित्त गावोगावचे भाविक मोठ्या श्रद्धेने आपला माथा तुकोबाचे चरणी टेकवून धन्य होतात.

संत तुकाराम मंदीरात फाल्गुन वद्य बीजेला पहाटे या भक्ती सोहळ्याचा प्रारंभ झाला.संताभिषेक व महापुजा पार पडली. तद्नंतर संत पालखी दिंडी सोहळ्यात भाविक सहभागी झालेत.टाळ मृदंगाचे स्वरात अभंग गायन, पावल्या फुगड्या खेळत भक्ती रंगात अख्ख कालवाडी ग्राम न्हाऊन गेले.पुंडलिका वरदे…,ग्यानबा तुकाराम, ॐ वासुदेव नमो नमः चे गजराने सारा आसमंत दुमदूमन गेला होता”या सोहळ्याचे अवघी अवतरली पंढरी .आळंदी .देहू” असेच वर्णन करावे लागेल
त्यानंतर ह.भ.प.ज्ञानेशप्रसाद पाटील यांचे काल्याजे किर्तन पार पडले महाप्रसादाने या बीज उत्सवाची पुर्णाहूती झाली..उपस्थित भाविकांनी महाप्रसादाला लाभ घेतला

दरम्यान ४ फेब्रुवारी ते ११मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह पार पडला.गाथा पारायणात भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते. प्रवचन किर्तन मालेत नामवंत महाराज मंडळींनी हजेरी लावून सेवा देत समाजप्रबोधन केले

सप्ताहाच्या आयोजनात मृदंगाचार्य ह भ प विष्णू महाराज गावंडे,गायनाचार्य सोपान महाराज उकर्डे,विक्रम महाराज शेटे, ,केशवराव महाराज अवारे यांनी महत्वाचे योगदान दिले तर नेव्होरी,सावरगांव,खापरवाडी ,विटाळी,वरुर जऊळका ,मरोडा येथील टाळकरी मंडळींनी विशेष सहकार्य केले.
या निमित्ताने या छोट्याशा गांवात श्रद्धा भक्ती ज्ञानाचा अपूर्व संगमाने वातावरण फुलून गेले होते.तरुणांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेवून नवचैतन्य निर्माण केले
काल्याचे किर्तन ह.भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील यांनी केले.

यावेळी वै. पंजाबराव हिंगणकर यांचे कार्यस्मृतींना उजाळा देत अभिवादन केले.दरम्यान ह.भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील यांचा सत्कार नंदकिशोर हिंगणकर यांचे हस्ते करण्यात आला.

हा भक्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी युवक मंडळीने अथक परिश्रम घेतले. सोहळ्यासाठी विशेष सहकार्य करणारे महाराज तथा देणगीदार,विणेकरी,अन्नदाते तथा गुणवंत विद्यार्थीनी कु पल्लवी दिपक हिंगणकर व भारतीय सैन्यदलात भरती झाल्याबद्दल जय वसंत मोहोड यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला
कार्यक्रमाचे संचालन सचिन हिंगणकर यांनी केले.मंडळाचे वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.याप्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.