हास्य कवींच्या शब्द पिचकारीने रंगले आकोट शहरवासी

0
569
Google search engine
Google search engine

हास्य कवींच्या  आतीषबाजीने शहरवासी झाले मंत्रमुग्ध

आकोटःसंतोषविणके

हास्य क्लब व सिल्वर फाउंडेशन अकोट यांचे संयुक्त विद्यमानाने आकोट वासियासाठी खास होळीनिमित्त हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. हास्य कवींच्या या अतिषबाजीने शहरवासी मंत्रमुग्ध झाले होते. गजानन मंदिर प्रांगण येथे रसिकांच्या उपस्थितीत ही हास्य फवाऱ्यांची होळी साजरी करण्यात आली.

यात हास्य कवि गौतम गुडदे परतवाडा, विजय सोसे चांदूरबाजार ,गजानन मते अचलपूर, व कवी विठ्ठल कुलट, गांधी यांनी आपल्या हास्य कविता सादर करून रसिकांना पोटभर हसविले.या कार्यक्रमाला महिला व पुरुष श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती उल्लेखनीय होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनगराध्यक्ष हरीणारायन माकोडे प्रमुख अतिथी सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांची उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन, पुष्पगुच्छ स्वागताने हास्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक हास्य क्लब चे अध्यक्ष ब्रिज मोहन गांधी यांनी तर संचालन सिल्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रभाकर पांडे यांनी केले आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रमोद लहाने यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम चौखंडे ,आनंद भोरे, दिलीप मजीठिया,मनोज वर्मा ,डॉ अविनाश भिसे, विजय भोरेे , अशोक घाटे, ऊमेश देशमुख, राजेश भोरे, राजेश पाचडे.यांनी परीश्रम घेतले.