*सोशल मीडियावरील शाळा, कार्यालयांना सुट्टीबाबतचा तो संदेश चुकीचा*

363
जाहिरात

 

अमरावती-: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा व कार्यालयांना आठवडाभर सुट्टी असल्याचा बनावट मेमोरँडम केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नावे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत असून, ती केवळ अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या नावे या बनावट मेमोरँडममध्ये, काही राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून 14 ते 21 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर झाल्याचा उल्लेख आहे. हा पूर्णत: चुकीचा संदेश असून, तो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसृत केलेला नाही. याबाबत प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनेही स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे.

अशा फेक मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूच्या संसर्ग प्रतिबंधासाठी यंत्रणा सुसज्ज असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

केंद्र शासन व राज्य शासनाकडून फेक मेसेज पसरविणा-यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।