तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान अवैध धंदे ठरणार डोकेदुखी,त्या अवैध गुटखा प्रकारण अध्यपही गुन्हा दाखल नाही?

जाहिरात

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान अवैध धंदे ठरणार डोकेदुखी,त्या अवैध गुटखा प्रकारण अध्यपही गुन्हा दाखल नाही?

अमरावती/चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यातील 62 ग्रामपंचायत ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले असून या कडे बिट जमादार,यांचे दुर्लक्ष मुळे अवैध धंदेचा उत आला आहे.तर तालुक्यातील चारही पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामपंचायत निवडणूक असल्याने पोलिसांना अधिक जास्त मेहनत करावी लागणार आहे तसेच वाढलेली गुन्हेगारी प्रवृत्ती ही पोलिसांची डोकेदुखी वाढवनार हे नक्की.

शिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत देऊरवाडा,शिरजगाव कसबा ,करजगाव या मोठ्या ग्रामपंचायत असून देऊरवादा या ठिकाणी अवैध धंदेचा माहेर घर झाले आहे.त्यामुळे शिरजगाव पोलिसांवर याचा अधिक भार राहणार आहे.ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राम्हणवाडा थडी आणि घाटलाडकी ,विषरोली हे मध्यप्रदेश च्या सीमेलगत असणारे गाव असल्याने या ठिकणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहे त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी अधिक जास्त मेहनत घ्यावी लागणार हे नक्की.

तर चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस यांनी अवैध पाने गुटखा विक्री वर कार्यवाही केली होती.मात्र ठाणेदार उदयसिग साळूके यांनी यावर काहीच कार्यवाही न केल्यावर कुपंनच शेत गिळत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.तर अमरावती च्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या आदेशाला चांदुर बाजार पोलिसांनी केराची टोपली दाखवली हे म्हणणे काही चुकीची नसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.