सईबाई मोटे सामान्य रुग्णलयाने पाळले काही डुक्करं ?

0
973

सईबाई मोटे सामान्य रुग्णलयाने पाळले काही डुक्करं ?

शेगांव :- शहारातीलचं नाही तर तालुक्यातील असे नामवंत असलेले सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय व तेथील प्रशासनाने त्यांच्या आवारात चक्क डुक्कर पाळले की काय ? अशी ओरड रुग्णालयाच्या अगदी शेजारी असलेल्या घरांतील नागरिक करीत आहे.
स.मो.सा. रुग्णालयाच्या शेजारी शेकडो घरे असलेली वस्ती आहे तर साहजिकच तेथे ते नागरिक स्वतः त्यांची लहान लहान मुले, वयोवुद्ध नागरिक असे परिवारासह वास्तव्यास आपल्या पिढ्यानपिढ्या पासून आहेत व ते आज अचानक ओरड करण्याचे कारण ही तसे पाहिले तर खुद्द रुग्णालय व तेथील प्रशासन स्वतः आहे, जशी रुग्णालयाच्या आतील भागात स्वच्छता असते तशी स्वच्छता रुग्णालयाच्या त्यांच्याच परिसरात तेथील प्रशासन का करीत नाही ? असा स्पष्ट सवाल तेथील नागरिक विचारीत आहेत.

रुग्णालयातील परिसरात वॉल कंपाऊंड आहे तर त्यालाच लागून नाली आहे आणि वॉल कंपाऊंड असूनही त्या नालीमध्ये रुग्णालयाने पाळलेले ? वराह अर्थातच डुक्करे त्यात वावरतांना दिसतात त्या नालीचा वापर रुग्णालय व वस्तीतील घरे मिळून होतो तर ती नाली आज एवढी गच्च भरलेली आहे की त्यात रुग्णालयातील असलेले रुग्ण तेथे कचरा फेकतात, रुग्णालयातील घान पाणी तेथे टाकले जाते, रुग्णालयात उरलेले उस्टे अन्न पदार्थ फेकला जातो फक्त फेकला जात नाही तर रुग्णालयात असलेल्या डुक्करांसाठी आणला जातो असाच म्हणावं लागेल तो अवघा परिसर घाणीने तुडुंब भरलेला आहे त्यामुळे तेथील घाणीचा त्रास रुग्णांना होतोच होतो त्याचबरोबर शेजारील नागरिकांच्या आरोग्यावर ही होतो आहे मलेरिया, डेंग्यू सारखे घातक आजार होण्याची दाट शक्यता आहे आणि काहींना याची कदाचीत लागण ही झाली असावी असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहे आणि याचा सर्व रोष रुग्णालयावर येत आहे कारण असे की नाली साफ करण्याच्या जिम्मेदारी वरून रुग्णालयातील प्रशासन आपले हात वर करीत आहे.
तर एकीकडे आपल्या मतदरसंघातील आमदार ज्यांना सामान्य नागरिक कर्म योद्धा म्हणून सन्मानाने हाक मारतात, विशेष म्हणजे हे की डॉक्टर पदवी प्राप्त असलेलं आ.डॉ.संजय कुठे स्वतःआहेत हे मागील १५ वर्षा पासून आमदार आहेतचं आणि त्यांच्याकडे देखील येथली तक्रार गेली आहे परंतु काही फायदा झाला नाही असेच दिसते मागच्या वर्षी तर सत्ता होती मा. महोदय आमदार मंत्री पण झालेत परंतु उपयोग तो काय…? प्रश्न जैसे थे चं राहिले…! आणि सामान्यतः डॉक्टर म्हटल्यानंतर स्वच्छतेचे काय महत्व आहे याची जाणीव असणाराच ना…? मग आता सत्ता नाही म्हणून काही करायचेचं नाही का…? असे प्रश्न जनता विचारत आहे, आम्ही मतदान करून काही चुकी तर नाहीना…? आपल्या भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी हे सांगून सांगून थकले की स्वच्छ रहा आपला परिसर स्वच्छ ठेवा तेवढंच नाही तर त्यासाठी वेगळा बजेट सुध्दा केला परंतु हा पैसा जातो तरी कुठे…? कुणाचं ठाऊक…?
कारण अधिकारी वर्ग सुद्धा निष्क्रिय झालेले दिसत आहे आणि जनतेत वेगळाच सूर दिसत आहे तो असा की, आमदार, खासदार, मंत्री फक्त उद्घटना पुरतेच दिसतात परंतु कोणी सुख सुविधेचा विचारणा करीत नाही अशाने सामान्य जनतेने जगायचे कसे हे तर कोरोना पेक्षाही घातक आहे…!