जलालखेडा येथे शेतीदिन साजरा – कृषी विभागाचा स्तुत उपक्रम

0
596

राष्ट्रीय गळीत धान्य व तेलबिया अभियानांतर्गत शेतीदिनाचे आयोजन

मनोज खुटाटे /  जलालखेडा प्रतिनिधी /

राष्ट्रीय गळीत धान्य व तेलबिया अभियानांतर्गत जलालखेडा येथे शेतीदिनाचे आयोजन दि. १२ मार्च २०२० ला करण्यात आले. या कार्यक्रमात कृषी तज्ञांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

या शेतीदिनाचे आयोजन जलालखेडा येथिल नर्मदा सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक शेती तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात  आले. यावेळी कृषी अधिकारी डॉ जुमडे यांनी कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व शेतीपयोगी योजनांबद्दल माहिती दिली व त्यांचा फायदा शेतकर्यांनी कसा करून घ्यावा. याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती व्यतिरेक अपारंपरिक शेती करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी सुद्धा या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी हळद विषय तज्ञ पोकळे यांनी सुद्धा मागर्दर्शन केले. त्याचप्रमाणे नेटाफेमचे जयदीप सिंग यांनी शेतकऱ्यां समोर येणाऱ्या अडचणी विषयी माहिती दिली व त्या कशा सोडवाव्या याविषयी दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी कृषी विभागातर्फे उत्कृष्ठ आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नरखेड पंचायत समितीच्या सभापती निलीमा रेवतकर, जलालखेडा येथील सरपंचा प्रतिभाताई घोरमाडे, उपसरपंच महेंद्र कुवारे, माजी सरपंच दिलीप हिवरकर व मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भारसिंगी येथील मंडळ कृषी अधिकारी गहुकर यांच्या नेतृत्वात कृषी सहाय्यक अमित वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.