नरखेड येथे शिवजयंती निमित्त निघाली भव्य शोभायात्रा – जय भवानी, जय शिवाजी च्या नाऱ्याने दुमदुमले नरखेड शहर

0
791

शोभायात्रेतील वेशभूष केलेल्या पात्र ठरले आकर्षण

 

मनोज खुटाटे जलालखेडा प्रतिनिधी /

शिवाजी मह्राजाचा जन्म केव्हा झाला, हे जरी संशोधनाचा विषय असला तरी मात्र शासनाच्या मान्यते नुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. पण काही संघटना व पक्ष हे तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. यामुळे काल ( ता. १३ ) नरखेड शहरात तिथीनुसार शिवसेनेतर्फे मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित शहरात निघालेली शोभायात्रा व त्यातील वेशभूषा केलेले पत्र नगर वासियांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते.

नरखेड येथील शहर शिवसेनेमार्फत मराठी महिन्याच्या तिथीनुसार काल ( ता. १३ ) साजरी करण्यात आली. यासाठी संपुर्ण शहरात भगवे तोरण व भगवे झेंडे लावून शहर भगवामय करण्यात आले होते. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील क्रांती ज्योती विद्यालयाच्या पटांगणातून सुरु झाली व शहराच्या मुख्य मार्गाचे क्रमण करीत शहराचे भ्रमण करून तिची सांगता साई मंदिर जवळ करण्यात आली. यावेळी अनेकांनी भगवी पगडी ही डोक्यावर घातली होती. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषाने सर्व शहर दुमदुमले होते. घोड्यावर स्वर वेशभूषेतील शिवाजी महाराज, झांसीची राणी, बाजीराव, रथावर स्वर जिजामाता, बाल शिवाजीचे पात्र हे मनमोहक होते, तसेच विद्यार्थ्यांनी केलेले लेझीम नृत्य हे शोभायात्रेची शोभा होती. याचबरोबर तरुणांनी डीजेच्या तालावर ताल घरला. राजेश सावरकर यांनी शिवाजी महाराज, चेतन लक्षणकर ने बाजीराव, चैताली अंतुरकर ने झांसीची राणी, अवंतिका ने जीजी माता व बाल शिवाजीची भूमिका दक्ष मेटकर यांनी वटविली. नरखेड येथील शिवप्रताप ढोल पथकाने देखील शोभायात्रेची शोभा वाढविली. शोभेयात्रेची सुरुवात जिजा माता व बाल शिवाजी यांचे कुंकुमतिलक प्रतिभा जाउळकर यांनी कर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा कुंकुमतिलक नगर परिषदेच्या उपाध्यक्ष अजय बालपांडे यांनी केले. याप्रसंगी शोभायात्रेत सहभागी ढोल पथक, लेझीमचे विद्यार्थी, विविध पात्रांची वेशभूषा केलेल्यांचा, घोडेवाले, बग्गीवाले इत्यादींचा सम्मान पत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजय बालपांडे, जिल्हा परिषद नागपूरचे माजी सभापती उकेश चव्हाण, अभिनेता सचिन गवळी, श्रुती गवळी, शिवसेना तालुका प्रमुख हिम्मत नखाते, शहर प्रमुख भारत अरमरकर, श्यामराव बारई, संजय कामडे, नगर सेविका प्रगती कडू, मनीषा अरमरकर, मिलिन देशमुख यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता निखील जिचकार, योगेश मानकर, विक्की काळबांडे, चंद्रकांत जिचकार, सुजय शिंदे, संजय बारमासे यांनी परिश्रम घेतले.