आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश :- मोर्शी ला नविन उपविभागीय महसूल अधिकारी , कार्यालय बांधकामास ३० कोटी रुपये निधी मंजूर !

0
1063
Google search engine
Google search engine

मोर्शीत साकारणार भव्य उप विभागीय कार्यालय !

रुपेश वाळके  / विशेष प्रतिनिधी /

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे मोर्शी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती उप विभागीय कार्यालय इमारत बांधकारीता सातत्याने पाठपुरावा करुन निधीची मागणी केली होती. शासनाने त्यांची मागणी स्वीकार  करीत बांधकाकरीता ३० कोटी ९१ लक्ष रुपये निधीस मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच नव्याने मोर्शी विधानसभा मतदार संघात उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाची भव्य इमारत उभी राहणार आहे. तसेच मोर्शी येथील तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारत उभारणीकरीताही सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात पूनर्विनियोजनामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच मोर्शी मतदार संघ विकासात्मक दृष्टीने विकसीत मतदार संघाकडके वाटचाल करणार आहे. त्याचबरोबर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून डिजीटल उवविभागीय अधिकारी महसुल अधिकारी कार्यालय साकारण्यात येणार आहे. अत्यंत जिर्ण अवस्थेमध्ये असलेल्या एसडीओ कार्यालयाची मागणी सातत्याने मोर्शी मतदार संघातील जनतेने कडून केल्या जात असून आमदार देवेंद्र् भुयार यांनी तातडीने दखल घेवून पहील्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरीव निधीची मागणी केली होती. सातत्याच्या पाठपूराव्यानंतर त्यांची मागणी स्वीकार्य करीत आमदार देवेंद्र भुयार व महीला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या सहकार्याने ३० कोटी ९१ लक्ष रुपये निधीची तरतूद महसूल विभागाच्या इमारत उभरणी करीता पुनर्वीनियोजनात मतदार संघाच्या सार्वभौम विकासाकरीता करण्यात आली आहे.