अवैध वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला आरोपीसह वाहन केले जप्त

जाहिरात

अवैध वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला
आरोपीसह वाहन केले जप्त

चांदुर बाजार:-

शिरजगाव कसबा येथील मेघा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू असून त्याची अवैध साठवणूक आणि रात्री किंवा सकाळी 4 च्या दरम्यान वाहतुक अवैध वाळू तस्करी करणाऱ्या कडून होते आहे.यात महसूल विभाग अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा वाळू तस्करी करणारे अधिक घेत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मेघा नदी आणि डोबन पुराच्या दरम्यान नाकाबंदी करून अवैध वाळू तस्करी करणारा ट्रॅकटर क्रमांक MH27 BB1185 आणि आरोपी किरण सूर्यप्रकाश अवसरमोल याला ताब्यात घेत 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर गुन्हची नोंद करण्यात आली आहे.

ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उपाध्यय यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र निबाळकर आणि त्यांच्या टीमने केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।