राज्यमंत्री थेट शेतकरी यांच्या बांधावर,तात्काळ सर्व्हे आणि पंचनामा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना दिले फोनवरुन आदेश

0
1045

राज्यमंत्री थेट शेतकरी यांच्या बांधावर,तात्काळ सर्व्हे आणि पंचनामा करण्याचे आदेश
उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना दिले फोनवरुन आदेश

अमरावती //चांदुर बाजार

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात दिनांक 17 ला रात्री च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, केळी, गहू ,संत्रा पिकाचे अधिक जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी याच्या तोंडाशी आलेला घास देखील हिरावून गेला आहे.या झालेल्या नुकसान ची लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आस शेतकरी वर्गाला लागली आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट शेतकरी यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे.आणि अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना पंचनामा करून अहवाल सादर करणायचे भ्रमणध्वनी द्वारे आदेश दिले आहे.

राज्यमंत्री यांनी थुगाव पिपरी,तसेच जसापूर, या भागाची पाहणी केली यावेळी नुकसान झालेले शेतकरी, गावचे पोलीस पाटील,तालुका कृषी अधिकारी, संतोष कितुकले, दिपक भोगाडे आणि नागरिक उपस्थित होते.