आकोटातील खवय्यांना कोरोना आपत्तीचा फटका

0
1030
Google search engine
Google search engine

आठवडी बाजार व उघड्यावरील मासं विक्रीवर बंदी

आपत्तीशी लढण्यास न.पा. प्रशासन सज्ज

आकोटःसंतोष विणके

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव पसरु नये यासाठी सर्तकता म्हणून आकोट पालिकेने शहरात रविवारी भरणारा आठवडी बाजार तसेच मटन मार्केट मध्ये होणाऱ्या उघडल्यावरील होणारी मांस विक्री बंद करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.मास विक्रीवर आलेल्या या बंदीमुळे नॉनव्हेज खवय्यांची अडचण होणार असून डेली वाल्यांचा वांदा होऊ शकतो.

शहरातील आठवडी बाजारात शहर व ग्रामिण भागातून अंदाजे २००० व्यापारी व ४००० ते ५००० ग्राहक बाजारात येतात. कोरोना वायरस बाबत दक्षता म्हणुन दिनांक २४ /३/२०२० पर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

उघड्यावरील मांस विक्री बंदी करण्यात आली आहे शहरातील व परिसरातील नागरिकांनी यांची नोंद घेऊन तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे तसेच घराची परिसराची स्वच्छता ठेवावी व नगर पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे,आरोग्य सभापती शिवदास तेलगोटे आरोग्य निरीक्षक चंदन चंडालीया यांनी केले आहे.