चांदुर बाजार तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि संत्राला शेतकरी सापडला आर्थिक संकट मध्ये,त्वरित पंचनामे करा शेतकरी वर्ग कडून मागणी

0
908

चांदुर बाजार तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि संत्राला

शेतकरी सापडला आर्थिक संकट मध्ये,त्वरित पंचनामे करा शेतकरी वर्ग कडून मागणी

चांदुर बाजार:-

दिनांक 17 मार्च 2020 च्या रात्रीला 9 ते 10 च्या दरम्यान सुरू झालेला अवकाळी पावसाने आपल्या सोबत विजांची आणि सुसाट वाऱ्याची उपस्थिती घेऊन आला आणि तालुक्यातील पिकांना मोठा हादरा बसला यामध्ये सर्वाधिक नुकसान गव्हाचे झाले असून संत्रा पिकाला सुद्धा याचा चांगलाच फटका बसला आहे.

8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकरी अधिक संकटाशी दोन हात करत होता आणि आता झालेल्या पावसामुळे त्याचे होते नव्हते पीक सुद्धा बाधित झाले आहे तर काढणीला आलेला गहू आणि हरभरा हा जमीनदोस्त झाला असून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे.त्यामुळे याचे पंचनामा लवकरात लवकर करून शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होते आहे.

या मध्ये तालुक्यातील शिरजगाव बंड, माधान,काजळी,जसापूर, मासोड ,आसेगाव,करजगाव, ब्राम्हणवाडा थडी,घातलाडकी,देऊरवाडा, थुगाव निभोरा या भागात तुरीच्या दाण्या इतकी आकार असलेली गार देखील झाली आहे.त्यामुळे आंबा बार असलेल्या संत्रा ला याचा अधिक जास्त फटका बसला असून कांदा, केळी, भाजीपाला याला सुद्धा या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.तर बातमी लिहिपर्यत महसूल विभागाने नुकसान बाबत अधिकृत अशी माहिती मिळाली नाही.

शेतकरी प्रतिक्रिया:-
काल रात्रीला झालेल्या पावसामुळे केळीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या पावसामुळे होते नव्हते पीक सुद्धा राहिले नाही.
1)मिलिंद देशमुख केळी उत्पादक शेतकरी

गव्हाला आणि हरभरा पीक हे काढणीला आले होते मात्र पावसामुळे गहू हा जमीनदोस्त झाला आहे आणि हरभरा चे देखील मोठे नुकसान झाले आहे.तर संत्रा मधील फळ सुद्दा गारपीट मुळे गळून पडले आहे.
2)राहुल खापरे शेतकरी थुगाव

शेतकरी यांच्या हाती आलेले पीक काल रात्री ला झालेल्या पावसामुळे राहिले नाही आहे.सरकार ने याचे त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी जेणे करून त्यांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळेल.
3)संतोष कितुकले