करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य आवश्यक विकास मीना (IAS) तहसीलदार यांचे नागरिकांना आवाहन चांदूरबाजार/ प्रतिनिधी

0
720

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य आवश्यक

विकास मीना (IAS) तहसीलदार यांचे नागरिकांना आवाहन

चांदूरबाजार/ प्रतिनिधी

सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या पाशर्््वभूमीवर,संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी नागरिकांनीही स्वत: सतर्क राहावे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनास तसेच आरोग्य विभाग सर्वेतोपरी प्रयत्न करीत आहे.परंतू सदर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी,शासनला व प्रशासनाला तालुक्यातील नागरिकांच्याही सहकार्याची गरज आहे. त्याअनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार, विकास मिना यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर देशातून किंवा देशाअंतर्गत, दूरच्या प्रवासावरून गांवात आलेल्या नागरिकांनी तातडीने स्वत:ची आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.ही तपासणी प्रवासा वरुन आल्यानंतर एका दिवसाचे आत करून घेणे आवश्यक आहे. ही तापासणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून या आरोग्य तपासणीला, दूरच्या प्रवासावरून आलेल्यांनी टाळू नये.ही सतर्कता स्वत: प्रवाशी व्यक्तीने घेणे गरजेचे आहे.तसेच अशा प्रवाशी व्यक्तीने तपासनी करून घेतली नसल्यास, इतरांनी एक दक्ष नागरिक म्हणून याची माहिती स्थानिक प्रशासनाला देऊन सहकार्य करावे. ही तपासणीसाठी प्रवासी व्यक्तीला,आपल्या जवळच्या शासकीय दवाखान्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामान्य ग्रामीण रुग्णालय,उप जिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापित आयसोलेशन युनिट या ठिकाणी आरोग्य तपासणी करून घेता येईल. कोरोना आजाराची मुख्यत्वे लक्षणे सर्दी, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होणे, निमोनिया, काही वेळेस मूत्रपिंडाचाही त्रास जाणवू शकतो. अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीची पावती, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक,नगर परिषदेचा आरोग्य विभागला सादर करावी.असे आवाहनही स्थानिक महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरीकांनी पुढील १५ दिवस बाहेर देशाचा, देशांतर्गत लांब पल्ल्याचा प्रवास टाळावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. सामूहिक सोहळे किंवा सार्वजनिक कार्यक्रम शक्यतोवर टाळावे.मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. नागरिकांकडून या सर्व बाबतीत सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव शंभर टक्के रोखल्या जाऊ शकतो, असा विश्‍वास तहसीलदार विकास मीना यांनी व्यक्त केला.