अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला 5 वर्षाची शिक्षा 2015 मध्ये घडली होती घटना

जाहिरात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला 5 वर्षाची शिक्षा

2015 मध्ये घडली होती घटना

अमरावती/शिरखेड

अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला होता.दाखल फिर्याद वरून शिरखेड पोलिसांनी मधुकर रामभाऊ टेकाडे रा.रिद्धपुर ता.मोर्शी,जिल्हा अमरावती वय 60 वर्ष याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हची नोंद करण्यात आली होती.

या प्रकरणात योग्य तपास करून याचे दोषारोप पत्र पोलीस उपनिरीक्षक आशिष बोरकर यांनी न्यायालयात दाखल केले होते.या प्रकरणी एकूण 14 जणांचे बयान घेण्यात आले.तर घटनेच्या वेळी पीडिता ही केवळ 7 वर्षची होती.या प्रकरण मध्ये सरकार तर्फे सहायक सरकारी वकील ऍड.शशिकरण भगवतीप्रसाद पलोड यांनी साक्षीदार तपासले.

या प्रकरणात मध्ये आरोपीला 5000 रुपये दंड 5 वर्ष पर्यत साधा कारावास इतकी शिक्षा सुनावली आहे.तसेच दंडाची रक्कम पीडित्याला नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।