आपली जबाबदारी ओळखून खबरदारी बाळगा :- संतोष कीतूकले यांचे आवाहन शहराबाहेर ग्रामीण भागातील जनतेने अधिक काळजी घेण्याची गरज

0
621
Google search engine
Google search engine

आपली जबाबदारी ओळखून खबरदारी बाळगा :- संतोष कीतूकले यांचे आवाहन
शहराबाहेर ग्रामीण भागातील जनतेने अधिक काळजी घेण्याची गरज

अमरावती /चांदुर बाजार

संपूर्ण देशात नव्हें तर जगात करोना विषाणू चा वाढत असलेला प्रादुर्भाव हा सर्वांची डोकेदुखी होते आहे.यात भारत देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र मध्ये आढळून आले असल्याने त्याची गंभीरता पाहता राज्य सरकारनं ने धडाडीचे पाऊले उचलले आहे.तर अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने सुद्दा सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रहार तालुका अध्यक्ष संतोष कीतूकले यांनी केले आहे.

सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण् यहयासाठी दिनांक 19/03/2020 ते 31/03/2020 या कालावधीत लग्न, किर्तन, प्रवचन,हरिनाम सप्ताह, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, शिबिरे, कार्यशाळा ज्यासाठी दहापेक्षा ( 10 ) जास्त लोक एकत्र येतील असे कुठलेही ही सार्वजनिक कार्यक्रम ग्रामपंचायतीचे हद्दीत आयोजित करण्यात येऊ नये.
मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद अशा शहरांमधून बाहेर गावावरून आलेले विद्यार्थी व नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी करून जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी या आदेशाचे उल्लंघन करन्यात येऊ नये याची गांभीर्याने नोंद घ्यावी व ग्रामपंचायतीस तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे हे नम्र आवाहन त्यांनी केले आहे.