संत वासुदेव महाराज मंदीर दर्शनार्थ बंद

160
जाहिरात

आकोटःसंतोष विणके
————————-
भाविकांचे श्रद्धास्थान गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धासागर स्थित मंदीर भाविकांच्या दर्शनार्थ दि.२० पासून बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

कोरोना संसर्ग पसरु नये यासाठी शासन प्रशासनाचे आवाहनानुसार श्री क्षेत्र श्रद्धासागर येथील श्री संत वासुदेव महाराज गुरु मंदीरात दर्शनार्थ येणा-या भाविकांची गर्दी टाळण्याचे अनुषंगाने भाविकांचे दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत मंदीर बंद ठेवण्यात आले आहे.तथा संस्थेचे सर्व धार्मिक व सेवा कार्यक्रम संस्थगित करण्यात आले आहेत.यांची भाविकांनी नोंद घ्यावी तथापि मंदीरातील नित्यनेमानुसार पुजापाठ सुरु राहील. सर्व भाविक भक्तांनी स्वतःची काळजी घेवून प्रशासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावे.घराबाहेर पडू नये,गर्दी टाळावी व सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।